प्रतिनिधी जिजाबाई थिटे
सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज केंदूरच्या स्थापनेनंतर सर्वाधिक गुण मिळवून कु.अवंती थिटे विद्यालयात आणि संस्थेच्या पुणे विभागात प्रथम आल्याची माहिती प्राचार्य श्री अनिल साकोरे यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या विशेष समानार्थ आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.फेब्रुवारी मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.बोर्ड परीक्षा सन २०२४-२५ मध्ये सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज केंदूर मध्ये विद्यालयाचा स्थापनेनंतर कु.अवंती चंद्रकांत थिटे ९८ % गुण मिळवून विद्यालयात आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर पुणे विभागात प्रथम आली.विद्यालयातून एकूण ९० विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसले होते यापैकी विशेष प्राविण्य मिळालेले एकूण विद्यार्थी २५ तर प्रथम श्रेणी मध्ये एकूण विद्यार्थी २७ आहेत.विद्यालयाचा निकाल ९१.११ असून विद्यालयाचा आता पर्यंतचा विक्रम कु.अवंती थिटे हिने मोडीत काढल्याबद्दल केंदूर ग्रामनगरीचे सरपंच उद्योजक प्रमोद पऱ्हाड,उपसरपंच मंगेश भालेकर,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे पुणे विभागीय सदस्य
राम साकोरे,विद्यालयाचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना पेढे भरवत त्यांचा सन्मान करत अभिनंदन केले.विद्यालयातील प्रथम तीन क्रमांकाचे मानकरी १) कु. अवंती चंद्रकांत थिटे. ९८%२)चि.मंथन श्रीहरी पऱ्हाड.९२.६०%३) कु.अदिती उमेश साकोरे ९०.४० %याप्रसंगी ग्रामनगरीचे मा.सरपंच सूर्यकांत थिटे,अमोल थिटे, पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना टीडीएफचे जिल्हाध्यक्ष प्रा.जितेंद्रकुमार थिटे,मा.सरपंच अशोक भोसुरे,सुनील बापू थिटे,शहाजी सुक्रे , उद्योजक बन्सी पऱ्हाड,उमेश साकोरे, पत्रकार श्रीहरी पऱ्हाड,शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.विद्यालयाचा निकाल चांगला लागला त्याबद्दल पंचकृषीतून यशस्वी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच शिक्षकाचे कौतुक होत आहे.