शिरूर प्रतिनिधी: शकील मनियार
दिं २८ ऑक्टोंबर रोजी शिरूर विधानसभा मतदारसंघातून शत्रुघ्न आपटे आपला उमेदवारी अर्ज असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थित भरणार आहे मध्यमवर्गीय, कष्टकरी,बेघर ,भटक्या विमुक्त जाती,शेतकरी,बहुजन समाज या सर्वांच्या कल्याणासाठी सदैव जनतेत, सर्व सामान्यांच्या प्रश्नांवर अभ्यास करून योग्य मार्ग अवलंबून जन सेवेसाठी सदैव तत्पर असणारे व्यक्तीमत्व, यावेळी विधान सभा लढविण्याचा चंग बांधला आहे.
यावेळी त्यांनी सांगितले की मी एक सर्व सामान्य कुटुंबातील असुण माझ्या घराण्याला कुठलाही राजकीय वारसा नसताना सर्व सामान्य जनतेच्या आशिर्वादाने मी विधान सभा निवडणूक लढविण्याचे ठरवले आहे.प्रतिकूल परिस्थितीत जिवन जगत असताना सर्व सामान्य समाजातील सुख दुखःची जाणिव असलेला समविचारी समाजा सोबत वावरत असताना अनेक खाच-खळगे जीवनात पाहीले आहे.कुठलाही राजकीय वरदहस्त नसताना सर्व सामान्य जनतेच्या जिवावर आणी सामान्य जनतेच्या ताकदीवर विधान सभा लढविणार आहे सर्व ताकदीनिशी तण,मण, धनाने थोर महापुरुषांचे विचार डोक्यामध्ये ठेवून आज पर्यंत मी सर्व सामान्य जनतेची जमेल त्या पद्धतीने प्रामाणिक पणे सेवा केली आहे.म्हणूनच जनता माझ्या पाठीशी ऊभी आहे.सर्व समाजातील जनतेच्या हितासाठी ताकदीवर व सर्व मायबाप जनतेचे आशिर्वाद घेऊन ही विधान सभा लढविणार आहे शत्रुघ्न आपटे यांचा विजय म्हणजे सामान्य जनतेचा विजय असणार आहे.