प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा व शिरूर तालुका आयोजित जिल्हास्तरीय आदर्श संस्थाचालक,गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर पुरस्कार सोहळा नुकताच विद्याधाम प्रशाला शिरूर या ठिकाणी २९ सप्टेंबर २०२४रोजी संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी पुणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर उपस्थित होते समवेत माजी शिक्षक आमदार भगवान आप्पा साळुंखे,माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा.आमदार सूर्यकांत काका पलांडे यांना जिल्हास्तरीय आदर्श संस्थाचालक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सूर्यकांत पलांडे हे शिरूर तालुक्याचे माजी आमदार असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांना शिक्षण महर्षी म्हणून सुद्धा संबोधले जाते श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असून संस्थेच्या एकूण ८ शाखा शिरूर तालुक्यात आहेत.
या सर्व शाळांमध्ये गोरगरिबांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो व या सर्व बाबींमध्ये सूर्यकांत पलांडे यांचे वैयक्तिक बारकाईने लक्ष सुद्धा असते.ग्रामीण भागातील मुले शहरी भागाच्या मुलांच्या तुलनेने कुठेही कमी पडू नयेत हा उदात्त हेतू त्यांच्या मनी कायम असतो.अडचणी व संघर्षावर मात करून एक आदर्श संस्था घडविण्यात सिंहाचा वाटा असणारे पलांडे काकांना सर्व जण आदराने शिक्षण महर्षी म्हणुन सुद्धा संबोधतात.अशा आदरणीय सूर्यकांत काका पलांडे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आदर्श संस्थाचालक पुरस्कार शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे,शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम सर,शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे सचिव अरविंद दादा ढमढेरे,खासदार निलेश लंके साहेब यांचे वडिल ज्ञानदेव लंके,प्रसिद्ध उद्योजक सुमतीलाल दुगड,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके,शिक्षक परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे,शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष निलेश काशीद,जिल्हा कार्यवाह महेश शेलार,माध्यमिक शिक्षक संघाचे सोमनाथराव भंडारे,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे आजीव सदस्य प्राचार्य अनिल साकोरे,जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्रकुमार थिटे,शिरुर तालुक्याचे अध्यक्ष प्रविण आढाव व शिक्षक परिषद परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.