प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक,शिक्षक-शिक्षकेतर पुरस्कार सन २०२४-२५ चा सोहळा विद्याधाम प्रशाला शिरूर येथे पार पडला.कार्यक्रमासाठी पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर,मा.आमदार सूर्यकांत पलांडे,मा.शिक्षक आमदार भगवान साळुंखे, संस्थाचालक, मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी विद्याधाम प्रशाला शिरूर येथे संपन्न झाला. यामध्ये शिरूर तालुक्यातील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कान्हूर -मेसाई, येथील शिक्षिका जयश्री दत्तात्रय गायकवाड यांना उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल जिल्हा परिषद माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते आदर्श गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.कर्तव्यदक्ष, प्रामाणिक,विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी सतत धडपडणाऱ्या, शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकवणाऱ्या, विद्यार्थी प्रिय शिक्षिका अशी त्यांची शाळेत ओळख आहे.
जयश्री गायकवाड यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणेचे कार्यवाह महेश शेलार,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके,माध्यमिक शिक्षक संघाचे सोमनाथराव भंडारे,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्राचार्य अनिल साकोरे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रा.जितेंद्रकुमार थिटे,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिरूर तालुका अध्यक्ष प्रवीण आढाव तसेच विद्या विकास मंडळाच्या अध्यक्षा अंजलीताई घोलप,सचिव सदाशिव पुंडे,विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद शिंदे,पर्यवेक्षक मनोज धुमाळ,सुप्रसिध्द निवेदक प्रा.प्रकाश चव्हाण व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,कान्हूर मेसाईचे सरपंच राजश्री रुपनेर,उपसरपंच योगेश पुंडे,संचालक विलास पुंडे,एकनाथ बुरसे,शामराव साळुंके,कल्याण कडेकर,कृषी अधिकारी अशोक गायकवाड तसेच शिरूर तालुक्यातील अनेक मान्यवर व कान्हूर पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.