प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
… .शिक्रापूर : जातेगाव बुद्रुक (तालुका .शिरूर ) येथील श्री . संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे यांना संस्था चालक शिक्षण मंडळ पुणे यांचे वतीने आदर्श गुणवंत प्राचार्य पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला .शैक्षणिक क्षेत्रातील गुणवत्ता वृद्धी नव, ग्रामीण परिसरात मुलींसाठी शिक्षणाची विशेष सुविधा,समावेशित शिक्षण,अध्ययन -अध्यापनात माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,विद्यालयात संगणक शास्त्र , पीक विज्ञान,अभियांत्रिकी विज्ञान व गणित विभागाची अध्यायवत प्रयोगशाळा उभारणी,शालेय नेतृत्व गुणवैशिष्ट्ये,शालेय सुरक्षितता व सुरक्षाविषयक उपाययोजनांना प्राधान्य,कृतीयुक्त शिक्षण यामुळे प्राचार्य थिटे यांना अष्टपैलू कार्याचा गुणवंत प्राचार्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अवसरी खुर्द ता.आंबेगाव येथील कवयित्री शांता शेळके सभागृहात हा समारंभ पार पडला.याप्रसंगी डी.जे.फाउंडेशनच्या विश्वस्त सौ.किरणताई वळसे पाटील,भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील,जिल्हा परिषद पुणेचे माजी अध्यक्ष विजयदादा कोलते,संस्था संचालक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल तात्या मेहेर,शिक्षण तज्ञ विष्णू काका हिंगे,शिवव्याख्याते गुलाबराव वळसे,सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार,आप्पासाहेब बेनके , पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर,उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे,राष्ट्रपती पारितोषिक विजेते कुंडलीक मेमाणे प्राचार्य वसंत ताकवले,सुनिल वळसे व शालेय सहकारी प्राध्यापक वृंद उपस्थित होते पुरस्कार प्राप्तीनंतर प्रतिक्रीया देताना प्राचार्य थिटे म्हणाले,”ग्रामीण परिसरातील आमचे विद्यालय विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे.शिक्षक हा सामाजिक अभियंता आहे.विद्यार्थ्यांना केवळ परीक्षार्थी न बनवता ज्ञानार्थी बनविणे व त्याच्या नागरिकत्वाचे,गुणवत्तेचे व संस्कारांचे कायमस्वरूपी संवर्धन करणे कामी विद्यालय कटिबद्ध आहे .सद्यस्थितीत राज्य व राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा,नवीन शैक्षणिक धोरण २०२० याबाबत सर्वांनी अभ्यासपूर्ण कामकाज करत शालेय विकासास सहाय्यभूत व्हावे अशी अपेक्षा आहे.पुरस्कार सन्मानाबद्दल संस्था मार्गदर्शक,माजी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप, संस्था अध्यक्ष सुगंध उमाप,सचिव प्रकाश पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.पुरस्कार प्राप्ती बद्दल विद्यालयीन शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वृंद,जातेगाव ग्रामस्थ यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.