शिरूर तालुका प्रतिनिधी : शकील मनियार शिरूर
तालुक्यातील शिक्षक म्हणजे उपक्रम व शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमुख केंद्र आहे यामुळे रोटरी क्लबचा राष्ट्र निर्माता शिक्षक पुरस्कार प्राप्त करणे म्हणजे जबाबदारी मध्ये वाढ असल्याचे प्रतिपादन पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले. शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर यांच्या वतीने सन 2024 साठीचे नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदान करण्याच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.हे रोटरी क्लब आदर्श शिक्षक पुरस्कारांचे अकरावे वर्ष होते. शिरूर तालुक्यातील विविध शाळांमधून प्राथमिक व माध्यमिक विभागाचे एकूण 21 गुणवंत शिक्षक यासाठी निवडण्यात आल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचे अध्यक्ष विठ्ठल वाघ व सचिव तुषार पाचुंदकर पाटील यांनी केले.
रांजणगाव गणपती येथे स्व.बाबुराव दौंडकर स्मारक समिती सभागृहामध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी पाठ्यपुस्तकातील कवी हनुमंत चांदगुडे,संस्थापक अध्यक्ष वीरधवल करंजे,असिस्टंट गव्हर्नर डॉ.मिलिंद भोसुरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापु ढमढेरे,शिक्षक संघटनेचे राज्य प्रवक्ते दादासाहेब गवारे, मारुती कदम, तुकाराम बेनके, राजेंद्र ढमढेरे, गुलाबराव गवळे, रामनाथ इथापे, अनिल साकोरे, रामदास चव्हाण,रोटरीचे संजय जी तांबे इ. मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून हा सन्मान सोहळा आयोजित केला असल्याचे प्रतिपादन संयोजक मनोहर परदेशी,राहुल चातुर यांनी सांगितले.याप्रसंगी महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ विजेते सचिन बेंडभर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त शिक्षक -गुरुदत्त पाचर्णे,गणपत बोत्रे,यशवंत बेंद्रे,महादेव पाटील,श्याम नाईक,विशाल कुंभार,अलका सातपुते,मनीषा साळुंखे,रमेश करपे,देविदास कंठाळे,दीपक मोरे,सुनंदा राहुलकर,सुरेखा डोईफोडे,विलास पुंडे,बाबासाहेब शेरकर,दत्तात्रय वाळेकर,गोरक काळे,दीपक सरोदे,पोपट भालेराव,गोरख कोथिंबीरे,वाल्मीक फाळके.