प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद आयोजित जिल्हास्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर पुरस्कार सन 2024-25 चा सोहळा विद्याधाम प्रशाला शिरूर येथे पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर आणि शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर मा.आमदार काकासाहेब पलांडे,मा.शिक्षक आमदार भगवान साळुंखे ,नंदकुमार निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी संपन्न झाला.भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलेगाव पागा येथील प्राचार्य तुकाराम बेनके यांचे शैक्षणिक आणि संघटनात्मक कार्यात दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. त्यामध्ये 2005 पूर्वी नियुक्त कर्मचारी जूनी पेन्शन योजना आंदोलन,विनाअनुदानित शिक्षकांचे विविध प्रश्न,टप्पा अनुदानासाठी आंदोलने अशा अनेक शैक्षणिक चळवळीत सहभागामुळे जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास शिक्षक परीषद पुणे ग्रामीणचे अध्यक्ष निलेश काशीद, संघटनमंत्री गुलाबराव गवळे ,पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर,सेकंडरीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम,उपाध्यक्ष रामनाथ इथापे,दादासाहेब गवारे,अनिल साकोरे,पुणे जिल्हा शिक्षक परिषद उपाध्यक्ष जितेंद्रकुमार थिटे, कार्यवाह महेश शेलार, तालुकाध्यक्ष प्रविण आढाव,कार्यवाह रविंद्र सातपुते,पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे वसंतराव ताकवले, दत्तात्रय रोकडे,दिलिप पापळ ,शिरूर-हवेली संघाचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे इ.मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला.