*============== भाग 3*काशिनाथ आल्हाट* तमाशा अभ्यासक

शिरूर प्रतिनिधी: शकील मनियार

तमाशा पंढरी नारायणगाव ============= मीरा सोनवणे यांनी लोककला जागृती मंच सन 2014 साली स्थापन केला.त्यामाध्यमातून भारत सरकारचा साॅग आणि ड्रामा (प्रचार आणि प्रसार) या कार्यक्रमाची सुरुवात केली. महाराष्ट्रातील अनेक लोकांना प्रबोधन करण्याचे काम केले आहे. या माध्यमातून ‘बेटी बचाव’ बेटी पढाव ” ” स्वच्छ भारत अभियान ” “पोषण आहार “या विषयांचे लोकांपर्यंत कलागुणांच्या माध्यमातून मनोरंजनांतून प्रबोधन करण्याचे काम केले. जालना, बीड, परभणी, कन्नड या भागात प्रबोधनाची जवळपास 300 पेक्षा जास्त प्रयोग केले.

या प्रबोधनाच्या माध्यमातून गावाचे आरोग्य टिकवण्यासाठी, गाव स्वच्छ करण्यासाठी त्यांनी गीते गायली. करू या ठरावं ,स्वच्छ आपलं निर्मळ गाव| स्वच्छता राखा ,हो घरोघरी ,कचरा फेकू नका रस्त्यावरती || या गीतांना गावकरी आणि गावातील महिलांची या कलावती सोनावणे यांची ओळख झाली होती. तसेच “बेटी बचाव’ बेटी पढाव” या विषयाचे सादरीकरण करत असताना . स्री जात मारू नका हो गर्भात ,दोन्ही घराचा लाविते दिवा| आई बाबा मला वाचवा || अशा हृदय द्रावक गायनाने अनेकांच्या डोळ्यांमध्ये पाणी आणणारी कालावती आपल्या कलेच्या माध्यमातून ज्या संत जनाबाई, रमाई, सावित्री ,जिजाबाई यांचा वारसा लाभलेला आहे .यांचा इतिहास सांगणारी महिला म्हणजे मिराबाई.ते इतिहासाचे महत्त्व त्यांच्या गाण्यात सादर करीतात. ‘खरं तर! कलेच्या क्षेत्रातील अनेक अनुभव मीरा यांना सुद्धा आले.त्यातच प्रपंचाची घडी बिघडली.नंतर जीवन जगण्यास काळोख निर्माण झाला. परंतु त्या ठिकाणी थांबल्या नाहीत . “चलना जिंदगी है, रूकना मौत है | या वचनानुसार जीवन जगण्याची वाट त्यांनी धरली त्यातून त्यांनी अनेक वळसे घेत वळसे घेत. आयुष्याची नाव तिराला लावण्याचा प्रयत्न केला. मुलगा किरण याला उत्तम शिक्षण दिले. त्याच्यावरती संस्कार केले . स्वतःला इंग्लिश शाळेत जाता आले नाही . इंग्लिश बोलता आले नाही .ही मनात खंत होती. नातू सिद्धेश याला इंग्लिश शाळेत दाखल केले. तो इंग्लिश बोलतो आहे . ते ऐकताना आणि पहाताना आजी म्हणून हृदय दाटून येते. आनंद होतो आहे. इंग्लिश शिकण्याची खंत मनातून काढून टाकली. नातीला सुद्धा भरत नाट्यम , कथक नृत्य अशा विविध कलेचा कलेची शिकवण दिली असे म्हणतात ,”ज्यांना कष्ट करण्याची ताकद आणि मनामध्ये जिद्द असते” ‘त्यांचा कालखंड हा उज्वल असतो'”.त्यांच्या आयुष्यात सोन्याची दिवस येतात. त्यांचा प्रवास म्हणजे तिमीरातून तेजाकडे ठरतो. मीरा सोनवणे यांच्या जीवनामध्ये तिमिराचा प्रवास घडलेला आहे. मीरा सोनवणे यांच्या जीवनामध्ये आज सोन्याचे दिवस आलेत. या कलाक्षेत्रात घेतलेले परिश्रम .त्याची फलप्राप्ती म्हणजे अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे.

दिल्ली येथे त्यांना लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने तर भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा. मेघराज भोसले यांच्या हस्ते बालगंधर्व पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले . कला क्षेत्रातील सन्मानाचा समजला जाणारा पुरस्कार ‘गुणवंत कलावंत पुरस्कार’ राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील या संस्थेच्यावतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय अनेक संस्था, संघटनांनी मीरा सोनवणे यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

या त्यांच्या कलागुणांनांची दखल घेत. नुकत्याच वनिता मंडळ यांच्या माध्यमातून निलिमा पटवर्धन यांनी आकाशवाणीवर त्यांची मुलाखत घेतली .संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांना या कलावतीच्या जीवनातील कलेतील पैलूंचा उलगडला झाला. हे सर्व वैभव कलेने मिराबाईंना दिले.यांचे श्रेय मातोश्री बुध्दवासी लक्ष्मीबाई सोनवणे यांना जाते. ‘कोणतेही यश हे एका व्यक्तीचे नसून’ ते त्या त्या प्रवाहात भेटलेल्या साथस़ंगत लाभलेल्या व्यक्तींचे असते.असा विचार माननारी मिराबाईं आहेत उर्वरीत आयुष्यात संत संप्रदायाची त्यांना गोडी लागली आहे .” कलेच्या क्षेत्रात जोपर्यंत श्वास आहे; .तोपर्यंत ही कलाजिवापाड जपण्याचे वचन त्यांनी घेतले आहे. “खरे तर ‘! कलेच्या जीवनातला मागोवा घेता. जीवन जगण्याचे साधन म्हणून नृत्य कला जोपासली. त्या कलेने जगणे सुकर केले. त्यातून जीवनाचा नावलौकिक पण झाला . ‘जीवनाला खरा अर्थ प्राप्त झाला.’

जगण्याची उमेद आहे. कलेचा साज आणि बाज आहे. आणि परिश्रम करण्याची जिद्द आहे. भविष्यात याची फलप्राप्ती नक्कीच महाराष्ट्र शासनाच्या घेईल. महाराष्ट्र शासनाच्यावती एखादा तरी पुरस्कार मिळवणारच. अशी अशा आहे .परंतु तो पुरस्कार स्विकारताना तो सोहळा पाहण्यासाठी वडील कै. गुलाबराव,आजी, माता लक्ष्मीबाई नसतील. दुःख निश्चित मनात कायम राहिल.

मिराबाईंची आत्या इंदुमती निवृत्ती सोरटे या एकेकाळच्या प्रसिद्ध नृत्यांगना , बोलपटात गणगवळण सादर करीत, तसेच उत्तम झील धरीत. त्यांचा काळ म्हणजे “बैलगाडीचा तमाशा” अनेक वर्षे बैलगाडीच्या तमाशातून अनेक गावांमध्ये तमाशा सादर केला.नंतर त्या मुंबई आणि पुणे या ठिकाणच्या अनेक थेटरमध्ये त्यांनी आपली कला सादर केली. त्या निमित्ताने मराठी क्षेत्रातील अनेक दिग्गज मराठी चित्रपट अभिनेते आणि अभिनेत्रींचा त्यांचा जवळचा संबंध आला होता. सध्या त्या 77 वर्षाच्या आहेत. इंदूमती सोरटे यांनी सुद्धा रंगभूमी एकेकाळी गाजवली होती. किसन कुसगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ, रामा नामा लवळेकर लोकनाट्य तमाशा मंडळ, सरस्वतीबाई कोल्हापूरकर लोकनाट्य तमाशा मंडळ, चंद्रकांत ढवळपुरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ, तसेच श्रीधर नलावडे निर्मित नाटक “माझ्या जाळ्यात घावलाय मासा” दादू इंदुरीकर सह मधू कडू निर्मित “गाढवाचे लग्न” या वगनाट्यातून अनेक भूमिका मिराबाईंच्या आत्या इंदुमती सोरटे यांनी गाजवल्या होत्या. मिराबाईंना लोककलेचा वारसा हा जन्मत: प्राप्त झाला होता. त्यांच्या घरात अनेक गुणवंत कलावंत होऊन गेले होते.

मिराबाईंच्या गुरुस्थानी असणाऱ्या आत्या इंदूमती सोरटे यांना भाची मिराबाई यांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्काराचा सोहळा पाहता यावा. अशी इच्छा जुन्या काळातील ज्येष्ठ नृत्यांगना इंदूमती सोरटे यांनी व्यक्त केली.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button