शिरूर तालुका प्रतिनिधी :शकील मनियार

मांडवगण फराटा ता. शिरूर जि.पुणे येथील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्याचे राज्य कार्याध्यक्ष व्याख्याते संतोष शामराव परदेशी यांना विश्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था भारत, इन्स्टिट्यूट मिनोझीस बांग्राझा पणजी, गोवा व संज्योती पब्लिकेशन यांच्या संयुक्त विद्यामाने रविवारी पणजी गोवा येथे गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर , गोवा राज्याचे माजी मंत्री प्रकाशजी वेळीप, माजी उपसभापती शंभु भाऊ बांदेकर, आय.एम.बी.गोवाचे अध्यक्ष दशरथराव परब, सरकारी वकील एन.डी.पाटील.विश्र्वशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजयभाऊ चौधरी आदी मान्यवराच्या उपस्थितीत संस्कृती भवन पणजी ,गोवा येथे प्रदान करण्यात आला..

परदेशी यांनी संस्काराचे जीवनातील महत्व, पर्यावरण या विषयावर अनेक व्याख्याने दिली आहेत. तसेच पर्यावरण वाचवण्यासाठी वृक्षारोपण व वृक्ष संगोपणासाठी भरीव काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते कार्य करीत आहे. वृत्तपत्रातून वेगवेगळ्या विषयावर त्यांचे लेख प्रकाशित आहे. कोरोना काळातही विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केले आहे. यापूर्वी त्यांना २५ हूनअधिक शैक्षणिक व सामाजिक पुरस्कार मिळाले आहेत.यासर्व कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या पुरस्काराबद्दल शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल बोरा ,शालेय समितीचे अध्यक्ष प्रकाश बाफना ,शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम , वाघेश्वर विद्याधाम प्रशालेचे मुख्याध्यापक रामदास चव्हाण, उपमुख्याध्यापक गणपत बोत्रे, पर्यवेक्षिका संपदा वेताळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुरेश ढमढेरे, उपाध्यक्ष बालाजी कांबळे,पालक संघाचे उपाध्यक्ष सचिन फराटे मांडवगण फराटा ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन केले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button