* भाग 2*काशिनाथ आल्हाट* *तमाशा अभ्यासक* तमाशा पंढरी नारायणगाव ==============
शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
तमाशा सम्राज्ञी नंदा जगताप पाटील, पिंपळकर , कुंदा पाटील या बहिणीं तमाशा क्षेत्रातील नामवंत कलावंत होत्या. कुंदा पाटीलची भूमिका तमाशा क्षेत्रात अतिशय महत्त्वाची होती. गायन, नृत्य, अभिनय त्यामुळे रसिकांनी त्यांना डोक्यावरती घेतले होते. त्यावेळी मीरा सोनवणे या फडात सहकलाकार नृत्यांगना म्हणून काम करत होत्या.
‘कलेच्या रंगदेवतेला दररोज वंदन करून’ गणगवळणीपासून ते भैरवीपर्यंत रंगमंचावरती कला सादर करण्याची संधी मिळत होती.या संधीचे सोने करावे .हाच विचार त्यांच्या मनामध्ये राही.एकदा संधी मिळाली. ती स्वतः बतावणी, नृत्य, अभिनय करण्याची. त्या संधीची त्या सातत्याने वाट पाहत होत्या .
या फडातील कुंदा पाटील या तमाशा फडात काही दिवस उपस्थित राहिल्या नाहीत. यावेळी त्यांच्या जागी मीरा सोनवणे यांना काम करण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करण्याचे काम केले. उत्तम नृत्य , उत्तम अभिनय करून रसिकांची मने जिंकली .टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांचा पाऊस ही मोठी कमाई त्यादिवशी झाली होती. ‘कला सादर करताना कष्टाचा विचार करायचा नाही .अशी सातत्याने शिकवण मीरा यांची आत्या, आजी आणि वडील यांनी दिली होती. त्यामुळे “रंगमंच हेच आपले दैवत आहे”.ही जाणीव ठेवून त्या कष्ट करीत.त्या नृत्याशी किंवा अभिनयाशी एकरूप होत तमाशा क्षेत्रात नंदा पाटील पिंपळेकर तमाशा नंतर , दत्तोबा तांबे शिरोलीकर ,मंगलाताई बनसोडे, गफूरभाई पुणेकर, मालती इनामदार, अशा अनेक तमाशा फडातून त्यांनी कला सादर केली. जवळपास तमाशा क्षेत्राचा 25 ते 30 वर्षाचा अनुभव पदरी ठेवून .अनुभव घेत राहिल्या. महाराष्ट्रातील अग्रगण्य राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या तमाशा सम्राज्ञी विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या बरोबरीने काही दिवस काम करण्याची संधी मिळाली. ते भाग्याचे क्षण आजही ते त्या विसरत नाहीत . यांच्या चरणी नतमस्तक त्या नेहमी होतात. हा संस्कार त्यांनी अंगीकारला आहे. ‘खरं तर’! कलाकाराला गुरु असावा लागतो .परंतु मीरा सोनवणे यांना तसा संगीत क्षेत्रातला गुरु लाभला नाही. किंवा कोणत्याही संगीत शाळेत त्या गेल्या नाही. जन्म: सरस्वतीचे दान त्यांच्या पदरात पडले होते.
तमाशा फडांमध्ये वगनाट्यातील असणारी गाणी, बतावणी, वगनाट्यातील भूमिका, सवाल जवाब ह्या त्या अस्कलितपणे पार पाडत. महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला तत्कालीन तमाशा तमाशा सम्राट जगताप पाटील पिंपळेकरांची कन्या नंदा पाटील पिंपळेकर या तमाशा फडातील रसिकांना आवडते वगनाट्य ” मुंबईचा गिरणीवाला” हे होते. या वगनाट्यात ‘मोलकरणीची’ भूमिका अतिशय उत्तम पद्धतीने त्या साजरी करीत.इरसाल मोलकरीणीचा बाज होता. तमाशा क्षेत्रानंतर मीरा सोनवणे यांचा प्रवेश लावणी कार्यक्रमात झाला. ‘सवाई मल्हार’; ‘सुरेखा पुणेकर’ ‘रंजन देशपांडे’ ‘ सुरेखा कुडची’ यांच्या स्वतःच्या बॅनरमध्ये सहकलाकार नृत्य केले. त्यामुळे तमाशा आणि लावणी या दोन्ही क्षेत्रातील असणारा रसिकांची आवड मीरा सोनवणे यांना माहिती झाली होती. या शिवाय. मिराबाईंचे पुढचे पाऊल म्हणजे मराठी चित्रपटात संधी मिळाली.”चल गंमत करू या” या चित्रपटामध्ये सुरेखा कुडची यांच्या बरोबरीने सहकलाकार व “टोपी खाली दडलय काय”? या मराठी चित्रपटात सुद्धा सह कलाकार म्हणून मीरा यांना संधी मिळाली.
खेड तालुक्यातील पाईट हे दुर्गम भागातील सौंदर्याने नटलेल्या गावात जन्मलेल्या ही कलावती स्वतःच्या कर्तृत्वावरती आणि कलेच्या साधने वरती महाराष्ट्राच्या रसिकांच्या गळ्यातील ताईत होईल. याची पुसटशी कल्पना देखिल आली नसावी. या महिलेने दिल्लीच्या तक्तापर्यंत गरुड झेप घेतली. ही खऱ्या अर्थाने कलेतील भरारी होती. म्हणावी लागेल. क्रमशः 3