शिरूर तालुका प्रतिनिधी : शकील मनियार
उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आपल्या आमदार निधीचा व इतर शासकीय निधिंचा उपयोग करून जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारे तसेच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात अल्पसंख्यांक समाजासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून देऊन अल्पसंख्यांक समाजाचा सर्वांगीण विकास करणारे महाराष्ट्रातील एकमेव युवा कार्यसम्राट व कर्मयोगी आमदार म्हणजेच अतुल बेनके होय असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अ.) राष्ट्रीय महासचिव तसेच गुजरात व छत्तीसगढ राज्यांचे प्रभारी हाजी सय्यद इर्शाद अशरफी यांनी व्यक्त केले आहे.कोणत्याही प्रकारचा पक्षीय वा अन्य भेदाभेद न करता आपल्या संविधानिक पदाची गरिमा व जाणिव ठेऊन आमदार अतुल बेनके समाजातील सर्व स्तरातील लोकांना तसेच तालुक्यातील प्रत्येक गाव – खेडी व वाड्या वस्त्यांना न्याय देऊन तालुक्यात भरघोस निधी उपलब्ध करून विकास कामे करतात.
आमदार अतुल बेनके हे महाराष्ट्रातील एकमेव आदर्श आमदार आहेत ज्यांनी अल्पसंख्यांक समाजासाठी सर्वाधिक निधी उपलब्ध करून देऊन अल्पसंख्यांक समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.अल्पसंख्यांक समाजास राज्यात सर्वाधिक निधी उपलब्ध करून देणारे कार्यसम्राट आमदार म्हणून आमदार अतुल बेनके यांना त्याचा मान व श्रेय जात असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अ.) राष्ट्रीय महासचिव हाजी सय्यद इर्शाद अशरफी यांनी दिली.