भाग 1**काशिनाथ आल्हाट* तमाशा अभ्यासक
शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
दिल्ली येथे लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार यांच्या शुभहस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार स्विकारताना मीरा सोनवणे यांच्या डोळ्यात आनंदाचा पूर आला. ‘ खरे तर! या मीरा सोनवणे यांचा प्रवास दिल्लीपर्यंत कसा झाला. ही एक संघर्ष कहाणी आहे. लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्या हस्ते तमाशा क्षेत्रातील गुणवंत कलावती मीरा सोनवणे यांचा सन्मान हा म्हणजे “तिमिरातून तेजाकडे आदर्शवत जीवन म्हणावे लागेल . कलाक्षेत्रात केलेल्या परिश्रमाचे सार्थक झाले असे म्हणावे लागेल . मीरा सोनवणे यांचा जन्म खेड तालुक्यातील अतिशय दुर्गम भागातील पाईट या गावात झाला .या गावात लालपरी एकच प्रवासाचे साधन होते.सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा लाल परी दिसत होती.असा हा दुर्गम भाग. पण या दुर्गम भागात कला संस्कृतीच्या सुगंधी फुलाचा जन्म झाला. आणि या रानफुलाने गावाचा नावलौकिक कलेच्या क्षेत्रातून केला.
‘कला संस्कृती झोपासणारे गाव म्हणजे पाईट गाव आहे’. याच गावात अगदी लहानशा घरात मिरा सोनवणे यांचा जन्म झाला. कलेचा वारसा वडील गुलाब सोनवणे यांच्याकडून प्राप्त झाला.गुलाब सोनवणे यांना जन्मतः सरस्वती प्राप्त होती.ते स्वतः गीत रचना करीत. उत्तम पोवाडे गात होते. गुलाब सोनवणे यांनी मुंबईमध्ये नोकरी केली. नोकरीतून ते गावाकडे आले.” गड्या आपला गाव बरा”! असे म्हणत गावात रममाण झाले .परंतु आर्थिक समस्या निर्माण होऊ लागली.खेड्यातले आपले जीवन जगू लागले. आर्थिक उत्पन्नाचे साधन कमी झाले . घरातील मोठी मुलगी मीरा सोनवणे यांच्यावरती घराची आर्थिक जबाबदारी पडली. असं म्हणतात, “मुलगी ही बापाचे हृदय असतं”!. ‘बापाच्या चेहऱ्यावरच्या भावनांची दखल फक्त मुलगी घेते ‘. त्याप्रमाणे मुलगी मीरा ही सोनवणे परिवाराची ‘धनाची पेटी ठरली’. घरात उत्पन्नाची साधने कमी आणि घरात खाणाऱ्यांची संख्या जास्त होती . मीरा यांनी कुठल्याही प्रकारची हार न मानता मिराबाई यांनी कुटुंबाची जबाबदारी स्विकारली. छोट्या मोठ्या काम करण्याची सवयी करुन घेतली. पाईट हे शेतकरी असलेले गाव होते. या गावामध्ये मिळेल ते काम हे मीरा करू लागली. शेतमजूर, भात लावणी, कांदा लागवड अशी शेती कामे केली. कामाची लाज ना बाळगता कुटुंबाला आधार दिला.भाऊ आणि बहीण यांना शालेय शिक्षण दिले.
मीरा सोनवणे यांचे कलेच्या क्षेत्रातील पहिलं पाऊल वयाच्या 9 व्या वर्षात पडले.’ज्या वयात हातात पाठी पेन्सिल घेण्याचे वय होते. त्यावेळी घूंगराच्या स्वरांशी मैत्री जमली. ‘घूंगरांची पूजा करण्याचे भाग्य नशिबी आले’.’घुंगरांची पूजा करत करत आयुष्य कलेला वाहून घेतले.’ मीरा सोनवणे आता वयाच्या आता 60 आल्या . तसे त्यांच्या पायातील घुंगरांनी सुद्धा साथ सोडली नाही . महाराष्ट्राच्या लोककलेचा प्रवास हा20 ते 25 वर्षे सतत मिरा बाईंचा राहिला. तमाशा क्षेत्रात अनेक वर्षांपासून अनुभव पदरी आहे. ‘बापाच्या करंगळीला धरून तमाशा क्षेत्रात प्रवेश केला. आजींने डोक्यावरून हात फिरवत म्हणाली होती. “कलाक्षेत्र हे काचेचे भांडे आहे”!. या क्षेत्रात आपण जपून वागावं. ! कसं वर्तन करावे ? ” पैशा पेक्षा कलेला महत्व द्यावे”! कलेमुळे नाव मिळते. अशी अशी शिकवण आजीने मिराबाईंना दिली .’ते शब्द हृदयात जपून मिराबाईंनी कलेचा प्रवास केला.’ मिराबाईंकडे उपजत कलागुण होते.
फक्त संधी मिळण्याची बाकी होती. वडील गुलाब सोनवणे यांचे शाहिरी कार्यक्रम आकाशवाणीवर प्रसारीत झाले होते . गायकीचे अंग त्यांना होते. वडीलांच्या बरोबरीने तमाशा क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर स्वतःच्या कर्तृत्वाची कवाडे मिराबाईंनी उघडली. ‘”पायातील घुंगरांच्या वेदना हाच माझा कलेतील श्वास आहे”. ‘जोपर्यंत जिवंत आहे. तोपर्यंत घुंगरांची पूजा करणार.कला जपणार.! अशी मनस्वी मनाची खूणगाठ मनाशी बांधली आहे. मिराबाईंचा पहिला तमाशा क्षेत्रात प्रवेश तमाशा सम्राट जगताप पाटील पिंपळेकर यांच्या तमाशा फडात झाला.महाराष्ट्रामध्ये गाजत असलेला हा तमाशा फड होता.तो तमाशा सम्राट जगताप पाटील पिंपळेकर यांची सुकन्या नंदा पाटील पिंपळेकर या तमाशा फडात प्रवेश झाला आणि जीवनाला कलाटणी मिळाली.कलेविषयी दांडगी इच्छा मिराबाईंच्या मनात आहे . त्यामुळे त्यातून त्यांना सत्तर मार्ग मिळत गेले. यासाठी नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला उत्तर त्या देत आहेत.