शुभम वाकचौरे
जय मल्हार हायस्कुल जांबूत विद्यालयाच्या पर्यवेक्षिका, तसेच क्रीडा व सांस्कृतिक विभाग प्रमुख मंदाकिनी दत्तात्रय पुजारी यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे तर्फे दिला जाणारा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या आदर्श शिक्षिका मंदाकिनी पुजारी यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
जांबूत ग्रामस्थांकडून मंदाकिनी पुजारी यांचे कौतुक केले जात आहे.विद्यादानाचे काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे तर्फे दिला जाणारा जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार सन २०२४. २९ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात. एक उत्तम विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांचे काम आहे. त्यांचे उज्ज्वल भविष्य हीच शिक्षकांच्या कार्याची पोचपावती आहे.विशेष मुलांचे शिक्षक याच भावनेतून मुलांना शिकवीत असल्याने त्यांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.पुरस्कार जाहीर झाल्यामुळे मंदाकिनी पुजारी यांचे जांबूत मधील ग्रामस्थांकडून अभिनंदन केले जात आहे.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी , माजी सरपंच जयश्री जगताप , ग्रामपंचायत सदस्य राहूल जगताप , ग्रामपंचायत सदस्य गोरक्ष गाजरे , सिताराम म्हस्के , बाळासाहेब पठारे, पंढरीनाथ गाजरे , बाळासाहेब बदर , कारभारी थोरात , शरद पळसकर , आनंद जगताप , आनंद शिंदे , युवराज पळसकर , दिलिप खुपटे, संजय गुरव , विष्णू राऊत , विकास डफळ, रवि म्हस्के , भानूदास पळसकर , शिवाजी बदर , उमेश राऊत व आदी ग्रामस्थ उपस्थित होते.