प्रतिनिधी : सचिन थोरवे
शेतकरी संघटनेचे नेते आणि क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष शिवाजी नांदखेले यांनी नुकतीच जुन्नर तालुक्यातील शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर नारायणगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणीवर आणि ऊस दराबाबत चर्चा केली असता महाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखाने ऊसाला कमी बाजार भाव देत असल्याचे त्यांनी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या ध्यानात आणून दिले.
1960 पासून विचार केला असता प्रत्येक की दहा वर्षांनी उसाचा बाजार भाव हा डबल होत गेलेला आहे बाकी परंतु 2014 15 वर्षाच्या दरम्यान मागील भावाचा विचार केला असता आज ऊसाला किमान पाच हजार पाचशे इतका बाजार भाव मिळणे अपेक्षित असताना तो 3200 इतका मिळालेला असून तो असमाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील काही कारखान्यांनी 3500ते 3700 इतका बाजार भाव मागील वर्षी गाळप केलेल्या ऊसाला दिला असून किमान तेवढा बाजार येथील शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे.
नारायणगाव येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वीज बिल माफ होण्यासाठी सातत्याने सरकार मागणी केल्यामुळेच शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज बिल माफी झाल्याचे त्यांनी सांगितले यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय भुजबळ उपाध्यक्ष अजित वालझडे, अजित वाघ, अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद खांडगे युवा आघाडीचे अध्यक्ष सचिन थोरवे युवा उपाध्यक्ष मनोज शिंदे उपस्थित होते.