निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
घोड धरणाचे आवर्तन सुटणार… चिंतातूर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार… पुण्यात कालवा समितीची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतीसाठीचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. या पार्श्वभूमीवर घोड धरणाच्या उजव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याची आग्रही मागणी आपण यावेळी केली. येत्या सोमवारपासून घोड धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून हजारो चिंतातूर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.