जुन्नर प्रतिनिधी – सचिन थोरवे
कुकडी प्रकल्पांतर्गत असलेला जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील नद्यांना पाणी न सोडता पाटबंधारे विभागाने ते पाणी बेकायदेशीर खरीप हंगाम म्हणून गेली तीस दिवस आवर्तन सुरू ठेवले आहे .
अखंड महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना ज्या ठिकाणी धरण आहेत त्या धरण क्षेत्रात देखील अतिशय कमी पर्जन्यमान झाल्यामुळे आणि पावसाचे दिवस जवळजवळ संपलेले आहे आणि यापुढे पाऊस होईल का नाही हे आपण सांगू शकत नाही त्यामुळे येडगाव धरणामध्ये अत्यल्प कमी साठा म्हणजे आज रोजीला 27% इतका पाणीसाठा आहे परंतु त्यामध्ये गेले अनेक वर्षापासून गाळ साचलेला असल्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी फक्त 16 ते 17 टक्के या धरणात पाणी शिल्लक आहे.
हे पाणी आताही कॅनल द्वारे नगर जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि त्या ठिकाणी पाण्याचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास येत आहे हे पाणी बंद न झाल्यास जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांवर भविष्यात पाणी टंचाईचे संकट ओढू शकते व येथील जनावरे साऱ्या वाचून आणि पाण्यावाचून मृत देखील होऊ शकतात आणि येथील नद्या कोरड्या असताना हे बेकायदेशीर आवर्तन बंद करावे आणि नदी त द्वारे पाणी सोडावे जेणेकरून नदीला पाणी सोडल्यानंतर ते पाणी आत्ता सद्यस्थितीत असलेल्या सोयाबीनला शेतकऱ्यांना देता येईल किंवा पशुधन वाचवण्यासाठी चारा पिकवण्यासाठी त्याचा वापर होईल आणि भविष्यातील पाणी संकट दूर होईल या मागणीसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अंबादास हांडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष संजय भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका संघटनेचे उपाध्यक्ष अजित नाना वालझडे तसेच अजित दादा वाघ युवा अध्यक्ष सचिन थोरवे प्रमोद खांडगे शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांनी सर्वांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी रावळे साहेब यांना विनंती केली का चालू असलेले बेकायदेशीर आवर्तन बंद करावे.
त्यावर त्यांनी आज पालकमंत्री आणि कालवा सल्लागार समितीची सिंचन भवन पुणे या ठिकाणी मिटींग आहे त्या मीटिंगमध्ये हा विषय घेऊ तोपर्यंत आपण हे आंदोलन स्थगित करावेअसे निवेदन शेतकरी संघटनेला दिले त्यावर आजच्या दिवसासाठी हे आंदोलन स्थगित करण्यात आले परंतु पाणी बंद न केल्यास शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक होऊन या ठिकाणी आंदोलन करेल असा इशारा तालुका अध्यक्ष संजय भुजबळ युवा अध्यक्ष सचिन थोरवे यांनी दिला आहे यावेळी जुन्नर पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधरी साहेब यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांची समस्या समजावून घेतली नारायणगाव पोलीस स्टेशनचे यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रभारी पोलीस निरीक्षक महादेव शेलार साहेब यांनी बंदोबस्त ठेवला होता उपस्थित सर्वांचे आभार संजय शेठ भुजबळ यांनी मानले.