प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांचे वतीने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्यु. कॉलेज केंदूर विद्यालयात सुरू असणारी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकास व प्रगती,सुरू असणारे कोडींग प्रशिक्षण,जपान भाषा प्रशिक्षण तसेच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यासारखे उपक्रम,विद्यालयाची भव्य आणि सुबक,सुंदर इमारत यांमुळे राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज (केगाव) सोलापूर याठिकाणी सोलापूर जिल्हा परिषद (प्राथमिक) शिक्षणाधिकारी मा.कादर शेख साहेब,माध्यमिक शिक्षणाधिकारी मा.सचिन जगताप साहेब,सोलापूर शहर पोलिस उपायुक्त मा.राजन माने साहेब यांचे हस्ते विद्यालयाचे प्राचार्य ए. टी. साकोरे यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी पुरस्कार घेण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे मा.उपाध्यक्ष दै.लोकमतचे पत्रकार श्रीहरी पऱ्हाड,लालबहादुर शास्त्री महाविद्यालय साताराचे उपप्राचार्य सुनिल शिंदे, ह.भ.प.पंडित बाबुराव थिटे,युवा उद्योजक विश्वासनाना पऱ्हाड,पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलचे नितीन काळभोर,श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व ज्यु.कॉलेजचे रामदास कांडगे,मनोज दौंड,जातेगावचे सामाजिक कार्यकर्ते कैलास मासळकर,नंदूशेठ गरुड उपस्थित होते.विद्यालयाला मिळालेल्या राज्यस्तरीय आदर्श पुरस्कारबद्दल पुणे जिल्ह्यामधून आणि पंचक्रोशीमधून विद्यालयाचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे .