प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणच्या अंतर्गत शिरूर तालुक्याची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली.रांजणगाव गणपती ता.शिरूर या ठिकाणी रविवार दि.०१सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणची सहविचार सभा पुणे विभागाचे उपाध्यक्ष मा. गुलाबराव डाळिंबकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.प्रमुख पाहुणे म्हणून पुणे विभागाचे संघटन मंत्री रामदास अभंग हे उपस्थित होते.
या सभेत शिक्षक परिषदेच्या शिरूर तालुका कार्यकारिणीचे गठण करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा शिक्षक परिषदेचे कार्यवाह महेश शेलार यांनी दिली. शिरूर तालुक्याची कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष- प्रवीण आढावउपाध्यक्ष-मच्छिंद्र खेडकर, सुधीर थोरात कार्यवाह- रवींद्र सातपुते कोषाध्यक्ष- सचिन रासकर कार्याध्यक्ष- विकास घुले सहकार्यवाह -रमेश घावटे, जयवंत कोकरे महिला आघाडी प्रमुख माधुरी डाळिंबकर महिला सदस्य -रूपाली नरोटे,अनिता चव्हाण अनिल गोल्हार- संघटन मंत्री राहुल तावरे- कार्यालय मंत्री रवींद्र उघडे- कार्यकारी सदस्य दत्ता लांडगे-कार्यकारी सदस्यनूतन कार्यकारणीचे शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष निलेश काशीद सर यांनी अभिनंदन केले.
सहविचार सभेमध्ये शिक्षक परिषदेची आगामी भूमिका,आंदोलने,शिक्षण विभाग विचार सभा,सदस्य नोंदणी,जिल्हा गुणवंत पुरस्कार याबाबत सखोल चर्चा झाली या सभेसाठी जुन्नर तालुकाध्यक्ष कैलास करपे, पुरंदर तालुका अध्यक्ष शिवहर लहाने,कार्यवाहक दीपक भोसले, सहकार्यवाह दत्तात्रय बनकर,ज्ञानेश्वर सस्ते, पुणे ग्रामीणचे नूतन सदस्य अशोक दहिफळे मोहन उमासे,संपत सांडभोर,गोपीनाथ जाधव,भरत मोठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.