शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार

(दि :26) रोजी पाटण -सातारा -स्वारगेट -शिवाजीनगर -शिक्रापूर -शिरूर ही बस सेवा सुरु करण्यात आली. सदर बस चे शिक्रापूर बस स्थानक येथे पूजन करून पुढे मार्गस्त करण्यात आली. यावेळी शिक्रापूर नगरीचे सरपंच रमेशजी गडदे, भुमाता ब्रिगेड शिरूर तालुका अध्यक्ष मंगल ताई सासवडे, शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुप चे स्वयंसेवक, शंभूराज युवा संघटना चे सदस्य, पुणे विभागाचे अधिकारी आणि समस्त ग्रामस्थ शिक्रापूर उपस्थित होते.

सदर सेवा चालु झाल्यामुळे सातारा, पाटण आणि पश्चिम महाराष्ट्रात जाण्यायेण्या साठी उपयुक्त अशी सेवा उपलब्ध झाली आहे. रा. प बस च्या शिक्रापूर वरून अजून काही नवीन बस चालु करण्याचा प्रयत्न ग्रुप मार्फत चालु आहे त्यामध्ये लवकरच यश येईल. शिक्रापूर ग्रामस्थाना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे काम शिक्रापूर समस्या आणि उपाय ग्रुप कायम अग्रेसर असेल यात तिळमात्र शंका नाही.यावेळी उपस्थित प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button