शिरूर प्रतिनिधी : शकील मनियार
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील उरळगावचे सुपुत्र सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारे निर्भड पत्रकार स्वरूप गिरमकर यांची द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार भाई शेख यांनी त्यांच्या प्रामाणिक व उल्लेखनीय कार्याचे दखल घेऊन त्यांना पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदचे नियुक्तीपत्र देऊन महत्वपूर्ण जबाबदारी देत निवड केली.
पत्रकार स्वरूप गिरमकर हे समाजातील विविध विषयांवर तसेच पत्रकारांच्या ज्वलंत प्रश्नावर बातम्यांच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत असून एक अनुभवी पत्रकार व महाराष्ट्रात मोठा जनसंपर्क अशी त्यांची ओळख आहे.
द युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून आपण पुणे जिल्ह्यात पत्रकारांची एकजूट करून त्यांना संघटित करून विविध योजना न्याय हक्कासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे निवड दरम्यान त्यांनी सांगितले त्यांच्या या निवडीबद्दल द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अन्सार भाई शेख राज्य उपाध्यक्ष हेमंत साठे कार्याध्यक्ष अनील करंदकर , सहसचिव विवेकानंद फंड मीडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रोहित वाळके पुणे जिल्हा अध्यक्ष शौकत शेख उपाध्यक्ष संतोष कदम शिरूर तालुका अध्यक्ष शकील भाई मणियार उपाध्यक्ष विश्वनाथ घोडके आदी पत्रकार बांधवांनी कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.