प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
जिल्हा क्रीडा परिषद,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व श्री बापूसाहेब गावडे विद्यालय टाकळी हाजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आमदार पोपटराव गावडे बोलत होते.
कार्यक्रमाला ग्रामविकास शिक्षण संस्थेचे सचिव युवानेते राजीवदादा गावडे,जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे,कविता खेडकर,ग्रामविकास शिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अजित गावडे,नगराध्यक्ष मनिषाताई गावडे उपसरपंच गोविंद गावडे,केंद्रप्रमुख महादेव बाजारे,शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेनके,श्री बापूसाहेब गावडे विद्यालयाचे प्राचार्य आर.बी.गावडे, शिरूर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे,मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम,महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्रा.जितेंद्रकुमार थिटे,विद्यालयाचे क्रीडा शिक्षक व क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष दौलत सोनवणे,माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष मारुती दरेकर,उपाध्यक्ष एकनाथराव शिवेकर,ॲथलेटिक्स संघटनेचे कैलास खंडागळे,एकनाथराव बगाटे,श्यामकांत चौधरी,खंडू जाधव,शांताराम उचाळे, काळुराम पवार,देविदास पवार,सुनील थोरात सोपान भाकरे,चांदाशेठ गावडे,कोळपे सर,भरतशेठ घोडे उपस्थित होते.आमदार गावडे पुढे म्हणाले की आधुनिक जीवनशैलीत प्रचंड ताण निर्माण होत असून आनंददायी शिक्षणासाठी खेळ आवश्यक आहे तरच निरोगी युवा संसाधन निर्माण होईल.युवा नेते राजीवदादा गावडे यांनी याप्रसंगी खेळाडूंना काही खेळातील संकेत समजावून सांगितले.
या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी तालुकाभरातून मुलांचे १४० तर मुलींचे १०४ संघ सहभागी झाले होते.कबड्डी स्पर्धेतील विद्यालयाच्या खेळाडूंसाठी किट तुकाराम उचाळे,निलेश सोदक,अजित चौरे यांनी उपलब्ध करून दिले.तर दोन दिवसाच्या या कालावधीत खेळाडूंना सुग्रास भोजन रमेश गावडे,कैलास गावडे,दत्तात्रय कांदळकर,संतोष गावडे,गणेश गावडे,प्रशांत चौरे, संदीपआण्णा सोदक,स्वप्निल गावडे,संतोष पानगे,प्रशांत गावडे यांनी दिले.प्रासादिक दिंडी मंडळाच्या माध्यमातून पाणी व्यवस्था करण्यात आली.