प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्यू.कॉलेज केंदूर विद्यालयात विद्यार्थिनीची सुरक्षितता बाबत विद्यालयातील सर्व विद्यार्थिनी त्यांचे पालक,महिला सखी मंच सर्व पदाअधिकारी,महिला दक्षता समितीचे सर्व पदाअधिकारी शिक्षक यांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली.

त्यावेळी शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरीक्षक मा.माधुरी झेंडगे यांनी दोन तास विद्यार्थिनी त्यांचे पालक,ग्रामस्थ आणि शिक्षक यांना समुपदेशन केले.विद्यार्थिनी सुरक्षितते साठी स्वतः विद्यार्थिनींनी एक पाऊल पुढे येऊन जर आपल्यावर अन्याय होत असेल,आपणांस असुरक्षित वाटत असेल तर तत्काळ आपले आई वडील,शिक्षक यांना सांगितले पाहिजे किंवा ११२ नंबर वर फोन करून तत्काळ पोलिस मदत घेणे गरजेचे आहे..तेही शक्य नसेल विद्यालयातील तक्रार पेटी मध्ये आपण लेखी तक्रार केली पाहिजे त्याची तत्काळ दखल विद्यालयाचे प्राचार्य,पोलिस अधिकारी घेत असतात. तसेच विद्यार्थिनी यांनी मोबाईल फोन , त्यावरील व्हॉट्स ॲप, Instagram, facebook वापर करू नये असा सल्लाही दिला .
दरम्यान सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत विद्यालयाचे प्राचार्य ए. टी. साकोरे यांनी केले प्रसंगी मावळ पंचायत समितीच्या माजी सभापती कल्याणी ढोकले,माले गावचे पोलिस पाटील शेळके ताई,स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूचे पुणे विभागीय सदस्य राम साकोरे,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष उद्योजक सतीश थिटे,माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष मयुरी खर्डे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष,संदीप सुक्रे,केंदूर गावचे पोलिस पाटील सतीश गावडे,दैनिक लोकमतचे पत्रकार श्रीहरी पऱ्हाड,माजी उपसरपंच भाऊसाहेब नामदेव थिटे, माजी सरपंच भाऊसाहेब सोपान थिटे, माऊली थिटे,शहाजी सुक्रे,उमेश साकोरे,माजी उपसरपंच अभिजित साकोरे,तसेच मोठ्या संख्येने महिला पालक उपस्थित होते.