शुभम वाकचौरे
शिरूर तालुका क्रिडा शिक्षक संघटना, महर्षि शिंदे हायस्कूल आंबळे व केसरी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा क्रिडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे संचलित शिरूर तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा आंबळे या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या त्यात तालुक्यातील अनेक मल्ल सहभागी झाले होते.अशी माहिती मुख्याध्यापक संजय कुमार जोरी सर यांनी दिली.
अतिशय खेळी -मेळीच्या वातावरणात या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन मा. श्री युनुस शेख पोलिस उपअधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, स्वप्निल भैया गायकवाड पुणे जिल्हा युवक अध्यक्ष (शरदचंद्र पवार गट, आप्पासाहेब धुमाळ (शिरूर तालूका कुस्ती संघ अध्यक्ष, प्रथम लोकनियुक्त सरपंच सोमनाथ अण्णा बेंद्रे व सर्व वस्ताद मंडळी यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण शिरूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार ऍड अशोक बापू पवार यांच्या हस्ते करण्यात आले. अशोक बापू पवार यांनी खेळाडूंसाठी लवकरच मोठे क्रीडा संकुल करण्याचे आश्वासन दिले.
या स्पर्धेचे नियोजन दुर्गे सर, खंडागळे सर यांनी केले. तर आभार शिरूर केसरी पै. जयदीप बेंद्रे व प्रदीप बेंद्रे यांनी मानले.