कवठे येमाई : प्रतिनिधी मारूती पळसकर
टाकळी हाजी (ता.शिरूर ) गावच्या विकासात चंद्रकांत ( आप्पा ) साबळे यांनी समर्पित भावनेने दिलेल्या योगदानामुळे या भागात विकासाची गंगा आणण्यास मदत झाल्याचे प्रतिपादन शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी केले.गावच्या जडणघडणीत व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले कर्तृत्व,दातृत्व व नेतृत्व संपन्न आदर्श व्यक्तिमत्व माजी चेअरमन चंद्रकांत आप्पा साबळे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा कुंड पर्यटनस्थळ टाकळी हाजी येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता.
चंद्रकांत साबळे हे आयुष्यभर आपल्या कुटुंबाला न्याय देऊन टाकळी हाजी गावच्या विकासासाठी झटत राहिले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी १ एकर बागायती जमीन दान करून वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.माझ्या राजकीय कारकिर्दीत त्यांचे मोठे योगदान आहे.त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे निष्ठा जपली.अलीकडच्या काळात अशी माणसे कमी राहिली असल्याची खंत माजी आमदार पोपटराव गावडे यांनी व्यक्त केली.आप्पांनी आपल्या सामाजिक जीवनात ४ भावंडांसह ३० माणसांचे एकत्र कुटुंब सांभाळत सामाजिक,राजकिय, शैक्षणिक कार्यात आपला ठसा उमटवला.समाजासाठी काम करणारे हिच तर खरी माणसे आहेत असे प्रतिपादन भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील यांनी केले.यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडूरंग पवार,अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी सभापती मधुकर उचाळे,जिल्हा परिषद सदस्या सुनीताताई गावडे,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेंद्र गावडे,शिवसेना नेते रामशेठ गावडे,सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त बाबाजी गावडे,सेवानिवृत्त सी.ई.ओ.प्रभाकर गावडे,पुणे मनपा माजी उपायुक्त हनुमंत नाझिरकर ,पंचायत समिती सदस्य डॉ.सुभाष पोकळे,शिरूर शहराच्या माजी नगराध्यक्षा मनिषाताई गावडे,टाकळी हाजीच्या सरपंच अरूणाताई घोडे,तज्ञ संचालक सोपानराव भाकरे, शिरूर मार्केट कमिटीचे माजी उपसभापती सतीश कोळपे,पारनेर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष भास्कर उचाळे,पारनेर मार्केट कमिटीचे माजी संचालक खंडूशेठ भाईक, शिरूर मार्केट कमिटीचे माजी संचालक सवित्राशेठ थोरात, माजी सरपंच दामूशेठ घोडे,बारकूशेठ भाईक,प्राचार्य आर.बी.गावडे, सेवानिवृत्त प्राचार्य प्रभाकर खोमणे, रंगनाथ वराळ, प्रदेश भाजपा व्ही जे एन.टी सेलचे सचिव किसनराव आटोळे,विविध गावचे सरपंच ,चेअरमन ,मित्रपरिवार व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मानपत्राचे वाचन संजय भाईक यांनी केले.प्रास्ताविक संभाजी साबळे यांनी व सूत्रसंचालन लहू साबळे यांनी तर आभार बाजीराव भाईक यांनी मानले .