जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
ओतूर ता:-जुन्नर येथील ओतूर सायकल ग्रुपच्या वतीने श्रीक्षेत्र ओतूर ते श्रीक्षेत्र आळंदी सायकल वारी चे नुकतेच आयोजन केले होते.पर्यावरणाचा व शारीरिक तंदुरुस्तीचा संदेश देत या ग्रुपने सलग तिसऱ्या वर्षी ही सायकल वारी पूर्ण केली.अशी माहिती ओतूर सायकल ग्रुपचे अध्यक्ष जयसिंग डुंबरे यांनी दिली. सायकल वारी सकाळी ४: ४५ वाजता ओतूर येथून निघाली आणि ११:३० वा.आळंदी मध्ये वारी पोहोचली.हि वारी महिला ग्रुपने आयोजित केली असून या वारीमध्ये ३० सदस्य सहभागी झाले होते त्यात महिला पुरुष आणि जेष्ठ सदस्यांचा सहभाग होता या वारी साठी संग्राम तांबे, सोपान वाघमारे आणि सुनीता मुंडे यांनी पाणी बॉटल नाष्टा आणि चिक्कीचे सौजन्य दिले तसेच सुभाष लोहटे बाबा यांचे गाडी साठी सौजन्य लाभले. सर्वांनी अगदी आनंदाने ज्ञानेश्वर माऊलीचे दर्शन घेतले.
आळंदी नगरीमध्ये सायकल वारीचे प्रचंड कौतुक झाले. ओतूर सायकल ग्रुपचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि इतरांना प्रेरणादायी आहे.अशी माहिती ग्रुपच्या सदस्या उर्मिला महाकाळ,दिपाली डुंबरे व मनीषा डुंबरे यांनी दिली.शारीरिक आरोग्यासाठी सायकल चालवणे निश्चितच गरजेचे आहे.त्यातून पर्यावरणाचे रक्षण तर होतेच परंतु आपली शारीरिक तंदुरुस्ती सुद्धा चांगली राहते.असे सचिव गणेश डुंबरे यांनी सांगितले ओतूर सायकल ग्रुपचे या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.