प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
आधुनिक जीवनशैलीत सकस आहार गरजेचा असून विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी तो आवश्यक असल्याचे प्राचार्य अनिल साकोरे यांनी याप्रसंगी सांगितले महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग यांच्यावतीने राष्ट्रीय धोरण ४ था वर्धापन दिनानिमित्त २२ जून २०२४ ते २८ जून २०२४ “शिक्षण सप्ताह” आयोजित करण्यात आलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे अंतरंग आणि बाह्याअंग विकसित करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज केंदूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तथा विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.अनिल साकोरे यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे वतीने प्रसिद्ध करणेत आलेल्या सप्ताह परिपत्रकानुसार सप्ताहातील प्रत्येक दिवसाचे नियोजन करून शिक्षक व विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रेरित केले आहे.
यामध्ये अध्ययन -अध्यापन साहित्य दिवस,संख्याज्ञान व साक्षरता दिवस,क्रीडा,सांस्कृतिक, कौशल्य डिजिटल दिवस,इको क्लब, शालेय पोषण आहार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य,भिंती पत्रके,चित्रे,भावल्या, मातीकाम,गणिती परिपाठ,कोडी, संख्याज्ञान,प्रदूषण संवर्धन,वृक्षारोपण संवर्धन व त्याचे महत्त्व,घोषवाक्य, विविध देशी खेळ,सांस्कृतिक कार्यक्रम,शिक्षक विद्यार्थी कथाकथन,वाचन,प्रभात फेरी,सामुदायिक सहभाग इत्यादी आनंददायी उपक्रम शिक्षण महोत्सव सप्ताहात राबवण्यात येणार आहेत .त्यासाठी विद्यार्थी, पालक,शिक्षक यांचा विशेष सहभाग होणार असून यातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न केला जाणार आहे.
या शिक्षण सप्ताहामुळे विद्यालयातील शैक्षणिक वातावरण उत्साहवर्धक व आनंददायी बनले आहे.आज सुप्रसिद्ध उद्योजक हिराबाई पापाभाई मुलाणी,प्राचार्य अनिल साकोरे तसेच समस्त ग्रामस्थ केंदूर यांच्या सहकार्यातून व शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकस व सुग्रास भोजन देण्यात आले याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभागीय सदस्य रामशेठ साकोरे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व पत्रकार श्रीहरी प-हाड,केंदूर नगरीचे यशस्वी व आदर्श उद्योजक हिराबाई मुलाणी,मा.उपसरपंच भाऊसाहेब थिटे विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.