जुन्नर तालुका प्रतिनिधी:-,रविंद्र भोर
दप्तरविना शाळा आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक कशाळा कुमशेत ता:-जुन्नर,जि.पुणे येथेसध्या राज्यात सर्वत्र पाऊस पडत असून पाऊसाचे टपोरे थेंब अंगावर झेलत बाल चिमुकल्यांनी पाऊसाचा आनंद लुटत आपल्या स्वरचित कविता लिहून गायन केले काही विद्यार्थ्यांनी पाऊसाचे चित्र काढून पाऊस रेखाटला तरइ री ते चौथी च्या विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे काव्यवाचन केले,पहिलीच्या विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातील पाऊसाच्या कवितांचे गायन केले.
धो धो धो पाऊस कोसळत असल्याने कविवर्य यशवंत घोडे दप्तर मुक्त शाळा आनंददायी शनिवार उपक्रमा निमित्ताने एक तास कवितेचा उपक्रम राबविला सर्जनशीलता निरीक्षण क्षमता, कलेला वाव मिळण्यासाठी उपक्रमाचे नियोजन केले.त्याला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.त्यामध्ये पुर्वा डोके, सायली डोके,प्रज्वल नाईकवाडी, श्रुती डोके,रिया डोके,साई डोके, तनुज डोके,स्वरा डोके,ओवी डोके देवांश डोके या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कविता लिहिल्या होत्या त्यांचे परिक्षण घोडे यांनी केले.तर श्याम लोलापोड यांनी पाऊस या विषयावर उर्वरित विद्यार्थ्यांनी जय डोके,स्वयंम डोके,भक्ती भास्कर, वेदश्री डोके,विराज वाणी,आरोही भगत, इश्वरी शेलार व पहिलीच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे परीक्षण केले, काही विद्यार्थ्यांनी संवाद लिहिले,काही विद्यार्थ्यांनी मुक अभिनयन केलं.काही विद्यार्थींनी कागदी होड्या बनवून साचलेल्या पाण्यात सोडून आनंद व्यक्त केला.त्यानंतर स्वरचित कवितांचे काव्यवाचन वर्गाबाहेर पाऊस झेलत छत्र्यांखाली घेण्यात आले.
विद्यार्थांनी उत्तम काव्यवाचन केले,कवितांचे ताला सुरात गायन केले.जल साक्षरतेवर आधारीत पाऊसा संबंधित कविताकृतीयुक्त सादर केल्या.काही विद्यार्थींनी पटांगणात जाऊन छत्रीखाली उभे राहून कृतीयुक्त पाऊसा संबिधीत कवितांचे गायन केले. विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच उत्साह दिसून आला.सर्व विद्यार्थ्यांनी पाऊसा संबंधित विविध उपक्रमांत सहभाग नोंदविला. जलसाक्षरतेचे महत्व पटले. परिसर निरीक्षण क्षमता वाढली, कलागुणांना वाव मिळाला. जिज्ञासा निर्माण झाली.