प्रतिनिधी: जिजाबाई थिटे
शालेय जीवनातच वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचे धडे पर्यावरण शिक्षणाच्या माध्यमातून देणे गरजेचे असल्याचे मत शिक्षक सेनेचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष रामनाथ इथापे यांनी व्यक्त केले ते मा मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित प्रेरणा पंधरावडा अंतर्गत शिक्षक आमदार व महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्ह्यातील नागेश्वर विद्यालय निमोणे ता,शिरूर येथे शनिवार दि २७ रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते. इथापे पुढे म्हणाले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः पर्यावरण प्रेमी असून त्यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने आज निमोणे विद्यालयात वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण घेत आहोत वृक्षारोपण करून त्याचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे मानवाला ऑक्सिजनची प्रचंड गरज असून त्यात वाढ करण्यासाठी वृक्षारोपण हा एकमेव पर्याय असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी शिवसेना शिरूर तालुका उपप्रमुख तथा चिंचणीचे मा.उपसरपंच अनिल बापू पवार,निमोणेचे मा. सरपंच तथा घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय काळे,उपसरपंच प्रशांत अनुसे,शालेय व्यवस्थापन समितीचे अमोल थोरात,राजहंस काळे, नवनाथ गव्हाणे,राहुल भोसले,संतोष काळे,चंद्रकांत काळे,सतीश साकोरे, शिवराज काळे,सुनिता शिंदे,नागेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम ढवळे, शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे,प्रफुल्ल सरवदे,अनिल शिरगिरे,सी.टी पाटील,अंकुश वाघ,प्रसन्न तिवारी,रूपाली नरुटे,भूषण चौधरी तसेच ग्रामस्थ,पालक,विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम ढवळे यांनी केले तर आभार शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे यांनी मानले.