निर्वी प्रतिनिधी -शकील मनियार
आज निमगाव दुडे येथे नवजीवन सामाजिक सेवाभावी संस्था च्या मार्फत वीट भट्टी कामगार तसेच अल्पसंख्याक वंचित मुलां साठी रक्षाबंधन कार्यक्रम मोठा थाटात साजरा केला त्या मुळे मुलांना देखील खूप आनंद झालेला पहाण्यास मिळाला, वेगवेगळ्या गप्पा गोष्टी सांगून उपस्थित मुलांना रक्षाबंधनाचे महत्त्व सांगण्यात आले.
नवजीवन बहुद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था अनेक प्रकार चे सामाजिक कार्य करत आहे अविरत समाजकार्याचे काम अध्यक्ष सुमनताई साळवे उपाध्यक्ष सुरैयाताई पठाण यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी करत आहे”
जपावे या बंधनात निरामय भावनेने जसे जपले मुक्ताई ज्ञानेश्वराने” स्त्रीचा ,बहिणीचा नेहमी आदर करावा मग ती कोणाचीही असो अशी शिवाजी महाराजांची शिकवण आहे असे प्रतिपादन नवजीवन संस्थेच्या सुमनताई साळवे यांनी केले त्या प्रसंगी सुरेखाबाई वाघ सुनिता माळी. सीमा पवार,वर्षा वाघ, सुवर्णा वाघ,सोनाली वाघ,रेखा मोरे. लहानुबाई वाघ ,सुशिलाबाई वाघ,माया वाघ तसेच आर्यन वाघ, प्रियंका वाघ ,सानिका वाघ, सृष्टी मोरे,विद्या पवार ,कार्तिक वाघ ,ओंकार मोरे, रोहित पवार, साहिल मोरे ,सागर गायकवाड आरुष वाघ,गौरव पवार ,यश वाघ प्रवीण पवार, शुभम बर्डे ,ओंकार वाघ, कुणाल बर्डे ,शिवा पवार ,श्रेयश वाघ ,शिवानी पवार व इतर उपस्थित होते.