जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
सहकार महर्षी शिवाजीराव दत्ता दादासाहेब काळे ग्रामीण पतसंस्थेची २० वी वार्षिक सर्वसाधारण सभा सद्गुरु कृपा लॉन्स ओतूर येथे प्रथम गणेश पूजन, दीप प्रज्वलन व श्रीफळ वाढवून सभेची सुरुवात करण्यात आली तदनंतर वर्षभराच्या कालखंडात दिगवंत झालेली सभासद थोर समाजसेवक व स्वातंत्र्य सैनिक यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. तदनंतर व्यवस्थापक शिला हांडे यांनी मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम केला व चालू वर्षाचा अहवाल वाचून दाखवला तसेच सर्व सभासदांसाठी दहा टक्के लाभांश मिळणार असल्याचे सांगितले. ही सभा अगदी खेळीमेळीच्या वातावरणात संस्थेचे अध्यक्ष किशोर होनराव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
यावेळी उपसभापती प्रकाश ताजने यांनी या संस्थेची वाटचाल यशाच्या शिखराकडे नेण्यासाठी मी सदैव तत्पर असेल तसेच आपणास वेळोवेळी सहकार्य करेल असे अभिवचन दिले त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनेश संचेती, सचिव रुपेश कवडे, सारंग घोलप, दीपक मस्करे, भगवान घोलप, शंकर नाना डुंबरे, शकील तांबोळी, आडतदार रोहिदास शिंदे, प्रदीप मुरादे, संतोष होनराव, शफी मोमीन, रेवन्नाथ कुलवडे, स्वाती फापाळे यांनी आपली मनोगते व्यक्त करुन संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सर्व सभासद, कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.सभेचे प्रास्ताविक सल्लागार शरद अहिनवे यांनी केले तर आभार भगवान घोलप यांनी मानले.
सहकार क्षेत्रातील व्यवसाय सातत्याने बदलत आहे. आर्थीक वातावरण आव्हानात्मक होत आहे. नियमांचे मापदंड अजुनच काटेकोर होत चाललेले आहे. आपल्या नियंत्रणापलिकडे असलेल्या मर्यादा पाळून काम करावयाचे फार मोठे आव्हान आहे. शासनाच्या निर्णयामुळे आर्थिक व्यवस्था अस्थिर झाली. या सर्वांच्या परिणाम संस्थेच्या व्यवसायावर होऊन संस्था फार जोखमीने चालवावी लागते. या सर्व गोष्टींचा संस्थेचे संचालक सभासद, कर्मचारी व संस्थेचे हितचिंतक यांच्या सहकार्यातून चालते. या सर्वाच्या विश्वासामुळे व सहकायनि संस्था प्रगतीपथावर आहे. सध्या सहकार क्षेत्रात खुप स्पर्धा असल्यामुळे व्यवसायिक वाढीचा वेग मंदावत आहे. तरी देखील संस्थेने या वर्षी ठेवींमध्ये रु. ३८,२५,६५८ ने अधिक वाढ होऊन रु. ३,४६,०३९०२.७८ ठेवी रु. २,९८,४१,२८५ इतके कर्जवाटप व गुंतवणुक रु. १,३०,०५,८८६ असा एकूण रु. ७,७४,५१,०७३.७८ इतका एकत्रित व्यवसायाचा टप्पा गाठला असून सभासदांना १०% लाभांश वाटण्यात येणार आहे असे अध्यक्ष किशोर होनराव यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.