प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
विकसित भारताच्या निर्मितीसाठी सुदृढ आणि सुसंस्कृत पिढी गरजेची असल्याचे मत पुणे जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी व्यक्त केले ते पुणे जिल्हा परिषद व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या वतीने नवनियुक्त शिक्षकांचे दोन दिवशीय प्रशिक्षण आयोजित केले त्यावेळी मार्गदर्शन करताना बोलत होते.आधुनिक भारतात शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल होत असून नवनवीन आधुनिक प्रवाह शिक्षणामध्ये येत आहेत.
त्याचा साकल्याने विचार करून सदृढ व सुसंस्कृत पिढी आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिक्षकच राष्ट्र उभारणीत खऱ्या अर्थाने योगदान देऊ शकतात असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या प्रशिक्षणा दरम्यान जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बाळकृष्ण वाटेकर,ज्येष्ठअधिव्याख्याता डॉ. प्रभाकरक्षीरसागर,विकास गरड,शोभा बच्छाव,सुवर्णा तोरणे,राजेश्री तिटकारे यांनी नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती ,शालेय समित्या व रचना,विद्यार्थ्यांच्या लाभाच्या योजना,पायाभूत साक्षरता,सातत्यपूर्ण सर्वंकाष मूल्यमापन आदी विषयावर सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षण समन्वयक आणि जिल्हा परिषद पुणेचे प्रदीप देवकाते,संतोष शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष देशमुख यांनी केले.