प्रतिनिधी : जिजाबाई थिटे
तळेगाव ढमढेरे ता.शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत शनिवार दिनांक १३ जुलै २०२४रोजी आषाढी एकादशी वारीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला.या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने प्रहारी गटाच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश देणारे फलक तयार करून जनजागृती केली व व्यसनमुक्ती ,नशा मुक्ती साठीच्या प्रभावीपणे घोषणा दिल्या.
याप्रसंगी प्रशालेतील विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी तसेच विविध संतांच्या वेशभूषेत प्रशालेत उपस्थित होते तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी यांनी दिंडीनिमित्त नऊवारी साडी व कुर्ता पायजमा असा पोशाख परिधान करून दिंडीची रंगत वाढविली. याप्रसंगी प्रशालेचे चित्रकलेचे उपशिक्षक अविनाश कुंभार यांनी प्रशालेच्या फलकावर विठ्ठलाचे व बाल वारकरी यांचे स्वरूप अप्रतिम अशा चित्रातून साकारले.सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे,उपमुख्याध्यापिका सुनिता पिंगळे व पर्यवेक्षक मोहन ओमासे यांच्या हस्ते प्रशालेतील पालखीचे पूजन करून दिंडीस प्रारंभ करण्यात आला त्यानंतर भव्य दिव्य असे चार गोलाकार रिंगण विद्यार्थी उभे राहून त्यांनी हरिनामाचा जयघोष केला तसेच वारकऱ्यांचे खास असलेले नृत्यही सादर करण्यात आले. या प्रसंगी अश्व रिंगण ही पार पडले. यावेळी या दिंडीमध्ये फुगड्या विविध खेळ यांचा आनंद सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांनीही प्रशालेच्या प्रांगणात लुटला.प्रशाले पासून प्रारंभ झालेला हा दिंडी सोहळा गावातून प्रमुख पेठांमधून गेला या दिंडीचे स्वागत प्रमुख चौकांमध्ये उत्साहात करण्यात आले. तेथील प्रांगणातही विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खेळ फुगड्या व गवळणींचा आनंद लुटला.
या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. या दिंडी सोहळ्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार, गुजर मानद सचिव अरविंद ढमढेरे ,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे आदींनी कौतुक केले व सदिच्छा दिल्या.