प्रतिनिधी : सचिन थोरवे

सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने विचार करावा यासाठी जुन्नर तालुक्यातील अनेक शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन सरसकट वीज बिल माफी व सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी श्री.प्रमोद खांडगे पाटील पुणे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय शेतकरी संघटना व सौ.सविताताई गायकवाड सरपंच संघटना जुन्नर तालुका, माजी सरपंच खोडद यांनी खलील निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.१)सरसकट विज बिल माफी करावी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना ७.५ एचपी पर्यंत थकीत असलेली विज बिल माफ करण्याची घोषणा केली परंतु साडेसात एचपीच्या अधिक अधिभार वापरणारे शेतकरी हे नदी अथवा धरणांमधून भागीदारी पद्धतीने लिफ्ट करत असतात जेणेकरून त्यांना मेंटनस अथवा येणारे बिल हे विभागून भरता येईल परंतु शासनाने याचा अभ्यास न करता ७.५यचपीच्या वरील आदिभार वापर करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय केलेला आहे त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना वीज बिल माफी देण्यात यावी.२)काही शेतकरी रेगुलर विज बिल कर्ज घेऊन उसनवारी करून भरत असतात त्यांच्यावर देखील शासनाने अन्याय केलेला आहे त्यामुळे त्यांना देखील प्रोत्साहन पर योजना शासनाने लागू केली पाहिजे ३) तालुका बिबट प्रवन क्षेत्र असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा थ्री फेज लाईट मिळावी.४)सरसकट कर्जमाफी करावी शासनाने घोषित केल्याप्रमाणे सातबारा कोरा करावा३) शेतीमालाला हमीभाव जाहीर करावा४)महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माननीय चंद्रकांतदादा पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षणाची घोषणा केली त्याची अंमलबजावणी तात्काळ करावी५)खते औषधे व शेती अवजारे यावरील GST शासनाने रद्द करावी६) गॅस,पेट्रोल व डिझेल यावरील किमती कमी कराव्यात वरील प्रमाणे मागण्या शासनाने तात्काळ मान्य करून शेतकऱ्यांची सरसकट कृषी पंपांची वीजबिल माफी, सरसगट कृषी कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा. अशा विषयाचे निवेदन श्री.रमेशजी शिंदे अध्यक्ष सह्याद्री शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य व श्री.विजयशेठ गायकवाड माजी सरपंच खोडद यांनी दिले.

त्यावेळी श्री.योगेश तोडकर अध्यक्ष पुणे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना, श्री.नितेश काकडे,श्री.ज्ञानेश्वर बोऱ्हाडे, श्री. बन्सी टेमगिरे उपस्थित होते तहसीलदार रवींद्र सबनीससाहेब यांना निवेदनाद्वारे पंधरा दिवसाचे अल्टिमेटम देण्यात आले आहे वरील प्रमाणे मागण्या मान्य कराव्यात अन्यथा पंधरा दिवसानंतर तहसीलदार कचेरी जुन्नर या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा जुन्नर तालुक्यातील शेतकरी संघटनांनी दिलेला असून महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री , महाराष्ट्रराज्य,उपमुख्यमंत्री महाराष्ट्रराज्य,कृषीमंत्री महाराष्ट्रराज्य,महसूलमंत्री महाराष्ट्रराज्य,विभागीय आयुक्त पुणे,कृषी आयुक्त पुणे,जिल्हाधिकारी पुणे,प्रांताधिकारी जुन्नर/आंबेगाव यांना प्रत रवाना करण्यात आली आहे.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button