शिरूर प्रतिनिधी: फीरोज सिकलकर
देशात नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम समाजाने भारताचे संविधान वाचविणे कामी जातीयवादी शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी व महाराष्ट्राची देशात असलेली पुरोगामी महाराष्ट्र ही ओळख कायम ठेवण्यासाठी महा विकास आघाडीच्या उमेदवारांना भरभरून मतदान करून अपेक्षे पेक्षा जास्त उमेदवार निवडून देऊन ही मविआच्या सर्वच नेत्यां व पक्षांकडून मुस्लिम समाजाच्या विश्वासाचा खून करण्यात येऊन राज्य सभा व विधान परिषदेच्या निवणुकीत एका ही मुस्लिम व्यक्तीस प्रतिनिधित्व व उमेदवारी न देता महाराष्ट्र विधान परिषद मुस्लिम मुक्त करून संपूर्ण मुस्लिम समाजाचा विश्वासघात केला गेला असा खळबळजनक व सणसणीत आरोप समस्त मुस्लिम जमात महाराष्ट्र चे प्रदेशाध्यक्ष/ सदर हाजी इर्शादभाई यांनी केला आहे.
जातीयवादी शक्ती व नेत्यांच्या धमक्यांना व टिकेला भीक न घालता संपूर्ण समाजाने भारताचे संविधान वाचविणे कामी पूर्ण शक्तिनिशी मविआ बरोबर राहून एक गठ्ठा मतदान करून यश प्राप्त करून दिले. मविआचे नेते मुस्लिम समाजाच्या उपकाराची परतफेड म्हणून समाजाला राज्य सभा अथवा विधान परिषदेत प्रतिनिधीत्व देऊन संधी देतील अशी अपेक्षा होती परंतु याउलट या नेत्यांनी समाजाचा विश्वासघात केला. गेल्या साठ वर्षांपासून मुस्लिम समाज ज्या नेत्यांना निवडून देऊन सत्तेत बसवितो, पडत्या काळात ज्या नेत्यांना व त्यांच्या पक्षाला ज्या मुस्लिम समाजाने जीवदान दिले त्याच नेत्यांकडे समाज न्याय मागत असताना समाजाच्या न्याय मागण्यांकडे जाणिव पूर्वक दुर्लक्ष करून कोणतेही स्वकर्तृत्व नसलेल्या एका विशिष्ठ समाजाच्या पंचवीस वर्षीय तरुणास विधान सभेच्या उमेदवारीची घोषणा करुन मुस्लिम समाजाच्या न्याय मागण्यांची थट्टा व अपमान करुन सदर नेते पुरोगामी व फुले शाहुआंबेडकरी विचारांचे असल्याचा आव आणतात अशी टिका हाजी इर्शादभाई यांनी केली.
बाबरी मशिद प्रकरण, मुंबई दंगल प्रकरण अशी एक ना अनेक मुस्लिम समाज विरोधी कृत्य विसरून तसेच उद्धव ठाकरेंनी मुस्लिम समाजा प्रती केलेली जातीयवादी व विखारी भाषणे विसरून मुस्लिम समाजाने मोठ्या मनाने लोकसभेत मविआ ला एक गठ्ठा मतदान करून कौल दिला. परंतु याउलट मविआ ने मुस्लिम समाजावर अन्याय करुन महाराष्ट्र विधान परिषद मुस्लिम मुक्त करण्याचे पाप केले याचे परिणाम विधान सभेच्या निवडणुकीत संबंधित नेत्यांना व पक्षांना भोगावे लागतील असा इशारा हाजी इर्शादभाई यांनी दिला आहे.
मुस्लिम समाजातील सर्व पक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी अंधभक्त न होता समाजावर होत असलेल्या अन्यायाबद्दल आवाज उठवावा. मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक राष्ट्रीय प्रवाहा पासून व सत्तेपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र होत असून समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या बद्दल आवाज उठवावा असे आवाहन करुन आपण लवकरच महाराष्ट्र राज्यात मुस्लिम जनजागृती अभियान सुरु करीत असल्याची माहिती हाजी इर्शादभाई यांनी दिली आहे. मुस्लिम समाजाला मुख्य राष्ट्रीय प्रवाहामध्ये आणण्यासाठी व त्यांचा सामाजिक – राजकिय व आर्थिक स्तरावर विकास होण्यासाठी येत्या विधान सभेच्या निवडणुकीत राजकिय पक्षांनी प्रत्येक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या दोन विधान सभा मतदारसंघांतून मुस्लिम समाजाला प्रतिनिधित्व व उमेदवारी देऊन निवडून आणण्याचे आवाहन हाजी इर्शादभाई यांनी राजकीय पक्षांना केले आहे.