जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
गुरुवार दिनांक २७ जून २०२४ रोजी डिसेंट फाउंडेशन जुन्नर पुणे व काळभैरवनाथ जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने खामुंडी,ता:- जुन्नर येथे ६९ जेष्ठ नागरिकांचा सामूहिक वाढदिवस व त्यानिमित्ताने मोफत भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात नेत्र तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया,हृदयरोग,मूत्ररोग,ब्रेस्ट कॅन्सर तपासणी,बीपी,शुगर व रक्तातील सर्व तपासण्या करण्यात आल्या. शिबिरामध्ये १८७ जणांनी सहभाग घेतला त्यापैकी १६ जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले.तसेच हृदयरोग व मूत्र रोगाच्या संशयीत रुग्णांचे ऑपरेशन श्री हॉस्पिटल आळेफाटा या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत केले जाणार आहेत.या शिबिरासाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल चे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील व त्यांची टीम,श्री हॉस्पिटल आळेफाटा येथील संतोष शिंदे, डॉशुभम कारंजकर,डॉ.सरोज पिंजारी,कैलास लासुर्वें,कृष्णा रोकडे,कोमल शिंदे,उर्मिला बगाडे,हिंदू लॅब चे प्रयोगशाळा तज्ञ मंगेश साळवे,प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूरचे डॉ.आर्जुन बढे,डोके हॉस्पिटलचे तपासणी तज्ञ सपना बेलवटे,पल्लवी थेटे व आशा सेविका यांनी सहकार्य केले. याप्रसंगी ज्येष्ठांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.ज्येष्ठांना फेटे बांधून त्यांचे औक्षण करून पारंपारिक वाद्याच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले व मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कारही करण्यात आला.ज्येष्ठांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या व आपले उर्वरित आयुष्य आनंदात घालवा असे डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई हे आपल्या अध्यक्षीय भाषणात शुभेच्छा देताना म्हणाले.याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले,शरदराव लेंडे, अनंतराव चौगुले,तुषार थोरात,शामराव माळी, डिसेंट फाऊंडेशनचे सचिव डॉ.फकीर आतार,जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. एकनाथ डोंगरे,डिसेंट फाउंडेशनचे संचालक आदिनाथ चव्हाण,भिवाजी माळवे, शंकर भिसे,लक्ष्मण चतुर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी काळभैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कुसाळकर, सचिव अरुण शिंगोटे,खजिनदार दत्तात्रय खोकराळे व सर्व सदस्यांनी प्रयत्न केले.