जुन्नर प्रतिनिधी : रविंद्र भोर
कान्हुर पठार येथील नाभिक समाजातील विनायक कुटे यांचा मुलगा निखिल कुटे याला मिझोरम एन आय टी मध्ये भौतिकशास्त्र या विषयात पी.एच.डी करण्यासाठी २५ लाख रुपयांची फेलोशिप मंजूर झाली आहे.निखीलच्या या यशाने आईवडीलांना आकाश ठेंगणे झाले आहे.
कान्हूर पठार येथील निखील कुटे याने १ ली ते १२ वी पर्यंत शिक्षण कान्हर पठार च्या जनता विद्यालयात शिक्षण पूर्ण करत वडिलांसोबत केशकर्तनालयात काम करत आपल्या पुढील शिक्षणाची वाट सुरु केली,घरची परिस्थिती बेताचीच पण न डगमगता शिक्षणासाठी काम करत ध्येय पूर्ती केलीच. भौतिकशास्त्रात एम.एस.सी पुर्ण करत प्राध्यापक पदावर काम सुरु केले. एन आय टी मिझोरम या ठिकाणी भौतिक साहित्यिक विज्ञान या विषयामध्ये पी. एच.डी साठी त्याची निवड झाली आहे. भौतिकशास्त्र मध्ये एन आय टी मिझोरम मध्ये संपूर्ण भारतातून एकूण ४५०० जणांपैकी फक्त तीन विद्यार्थ्यांची निवडले आहेत.त्यात निखील ची निवड संपूर्ण भारतात २ ऱ्या क्रमांकाने झाली आहे. निखील महाराष्ट्रात प्रथम आणि भारतात दुसरा आला आहे. या करता केंद्र सरकारकडून २५ लाख रुपयांची फेलोशिप मंजूर झाली आहे. याकरिता निखील ला आई, वडील व भाऊ यांच्या पाठिंब्याने व मार्गदर्शनाने या यशाला गवसणी घातले आहे.त्याच्या या यशाने प्रभावित होत डॉ.निलेश लंके यांनी व माऊली मामा गायकवाड बारा बलुतेदार महासंघाचे पदाधिकारी नवनाथ राऊत, मनोहर राऊत, सुनील आतकर, गणेश खंडाळे यांनी कौतुक करून सन्मान केला.
निखील च्या या उत्तुंग यशाचे संपूर्ण पारनेर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कौतूक होत आहे. त्याच्या यशाचे तालुक्यातील तरुणांनी बोध घेण्याची गरज आहे.