प्रतिनिधी :सचिन थोरवे

पोलीस, दिव्यांग नागरिक, महिला, युवक, शासकीय अधिकारी,फॉरेस्ट अधिकारी, शालेय विद्यार्थी, पत्रकार, राजकीय पदाधिकारी असे 425 रक्तदात्यांनी घेतला रक्तदान शिबिरात सहभाग* *नारायणगाव पोलीस स्टेशन,डॉ.कथे डायग्नोस्टीक नारायणगाव,पुना ब्लड सेंटर नारायणगाव, जीवन मल्टिस्पेशालीटी हॉस्पीटल नारायणगाव,यांचा स्तुत्य उपक्रम,..* नारायणगाव पोलीस स्टेशन मिटींग हॉल येथे सामाजिक बांधिलकी म्हणून आज दिनांक 27/06/2024 रोजी सकाळी 9/00 वा.ते सायं 5/00 वा.चे सुमा. पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख सो,अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर उपविभाग श्री रवींद्र चौधर , स्थानिक गुन्हे शाखा अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशन तसेच डॉ.कथे डायग्नोस्टिक सेंटर नारायणगाव व जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नारायणगाव यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर रक्तदान शिबिरासाठी नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीमधील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.एका दिवसात *425* रक्तदात्यांनी रक्तदान करून नवा इतिहास रचला आहे,सदर रक्तदान शिबिरामध्ये नारायणगाव पोलीस स्टेशन कडून नागरिकांना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा अपघाती मृत्यु 5 लाख रुपयापर्यंत मोफत अपघाती विमा तसेच सर्व रक्तदात्यास नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने प्रत्येकी 1 हेल्मेट व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले असून प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सदर रक्तदान शिबिरामध्ये सहभाग नोंदवला. विशेष बाब म्हणजे सदर रक्तदान शिबिरात रियाज हमीदभाई मोमीन रा-वारूळवाडी तालुका-जुन्नर जिल्हा-पुणे यांनी सहकुटुंब सहपरिवार रक्तदान केले तसेच, दिव्यांग नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी, राजकीय पदाधिकारी, पत्रकार, शिक्षक, शासकीय अधिकारी यांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. सदर रक्तदान शिबिरासाठी श्री अमितशेठ बेनके,श्रीमती आशाताई बुचके,श्री संतोष नाना खैरे,श्री.माऊली खंडागळे,श्री योगेश उर्फ बाबू पाटे,श्री.सुरज वाजगे, श्री.आकाश बोरकर,श्री. अविनाश डावखर,श्री. गणेश वाजगे, श्री.सचिन थोरवे,श्री.प्रमोद खांडगे,श्री योगेश तोडकरी,डॉ. पंजाबराव कथे,डॉ. पिंकी कथे,डॉ. लहु खैरे,श्री रमेश बिराजदार, श्री आकाश जगताप,श्री अमोल नरवडे,श्री संतोष साठे,श्री भास्कर गाडगे,श्री.दादामिया पटेल,श्री.ज्ञानेश्वर शिंदे,श्री निवृत्ती काळे,सर्व पोलीस पाटील,नारायणगाव हद्दीतील सर्व पत्रकार बंधू ,सरपंच,महिला दक्षता समितीच्या सदस्या,ग्राम सुरक्षा दल,कथे डायग्नोस्टिक सेंटर व जीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल टीम चे पदाधिकारी, पुना ब्लड सेंटर स्टाफ,न्यू इंडिया इन्शुरन्स चे सर्व अधिकारी कर्मचारी,तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री महादेव शेलार, पोलीस उपनिरक्षक श्री विनोद धुर्वे , श्री सनिल धनवे, श्री जगदीश पाटील व सर्व अंमलदार यांचे विशेष सहकार्य लाभले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button