जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

जून महिना संपत आला तरी माळशेज घाटात पाऊस पडेना.त्यामुळे येथील छोटे-मोठे टपरीचालक, व्यावसायिक चिंतातूर झाले आहे.कारण मागील वर्षी अतिवृष्टीमुळे माळशेज घाटातील काही धबधब्यावरील लोखंडी रेलिंग तुटले होते तर सिमेंट काँक्रीट फुटिंग उखडले होते.त्याबाबत त्वरित दुरुस्ती करण्यासंबंधीचे निवेदन देण्यात आले होते.त्या पैकी बऱ्याच ठिकाणी ढिसुळ झालेल्या धोकादायक दरडीचे दगड काढून दुरुस्ती केल्याची माहिती करंजाळे ता:-जुन्नर टपरीचालक,मालक संघटना अध्यक्ष सुभाष जगताप यांनी दिली.

माळशेज घाटातील प्रसिद्ध असलेले बोगदेश्वर मंदिराच्या बाजूच्या कड्यावरील ढिसुळ झालेले दगड तसेच नेट मध्ये निसटून अडकलेले दगड काढण्यात आले असून फ्लेमिंगो वॉटरफॉल (जांभळीचे पाणी) येथे अतिवृष्टीमुळे संरक्षण कठडे व खालील सिमेट काँक्रीट पूर्णपणे तुटलेले होते.त्यातच कोणीतरी माळशेज घाटात दरड कोसळली असून पर्यटकांना घाट बंदी घालण्यात आली आहे अशी अफवा पसरवून दिली मात्र कोणत्याही प्रकारची दरड कोसळली नसून संभाव्य कोसळणाऱ्या धोकादायक दरड व दगड काढून टाकण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत होते

कारण ते दुरुस्तीचे निवेदन माळशेज घाटातील पर्यटकांवर अवलंबून असलेल्या टपरीचालक मालक संघटना,करंजाळे ता:- जुन्नर यांनी माजी पंचायत समिती उपसभापती अनिल घरत व आमदार किसन कथोरे यांचेकडे दिले होते व हेच काम सुरू होते यादरम्यान टोकावडे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक चकोर आणि त्यांची ट्रॅफिक पोलीस यंत्रणा पेट्रोलिंग करीत होते.त्यामुळे माळशेज घाट वर्षाविहारासाठी सुरक्षित झाला असून पर्यटकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये अशी विनंती तीनशेहून अधिक छोटे मोठे व्यावसायिकांनी केली आहे.

कारण माळशेज घाट पावसाळ्यात वर्षा विहारासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.त्यामुळे आदिवासी बांधवांना चांगला रोजगार उपलब्ध होत आहे.या निवेदनाचा संघटनेने पाठपुरावा केल्यामुळे पावसाळ्या आधीच ही डागडुजी व दुरुस्ती झाल्या- बद्दल संघटनेकडून प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे.करंजाळे माळशेज घाट,रजिस्टर टपरी चालक मालक संघटना अध्यक्ष सुभाष जगताप,उपाध्यक्ष नंदकिशोर जगताप,बाळासाहेब पवार,अंकुश भोईर, खंडू मुंढे,विष्णू पवार,दत्ता पवार,राहुल भांगले,धोंडू लांडे,सुधीर तलवडे,शंकर लांघी,काशिनाथ कोरडे, शंकर जगताप,राहुल चव्हाण,भरत माळी,गणेश बांबळे,काशिनाथ जगताप व ग्रामस्थांनी मागणी केली होती.

सर्व निसर्ग प्रेमींना विनंती व सुचना करण्यात येते की माळशेज घाट व काळु धबधबा जो की हुल्लडबाज व अतिरेक करणा-या पर्यटकांच्या अपघातामुळे बदनाम होतोय हे जर असंच होतं राहीलं आणि यावर जर बंदी घालण्यात आली तर सह्याद्रीच्या या सौंदर्याच्या लाभापासून आपण सर्वानाच वंचित रहावे लागेल. त्यामुळे अशा ठिकाणी जाऊन पर्यटनस्थळे आपल्या मुळे बदनाम होणार नाहीत याची काळजी आपण स्वयं शिस्तीचे पालन करत काळजी घेतली पाहिजे किंवा दूरवरूनच हे दृष्य पाहून अत्यानंद मानला पाहिजे जेणेकरून स्थानिकांच्या रोजी रोटी वर आपल्यामुळे गदा येणार नाही व त्यांना आर्थिक अडचणी निर्माण होणार नाही याबाबत जबाबदारी घेतली पाहिजे आपण सगळेच याबाबत नक्की विचार करून सहकार्य कराल हीच अपेक्षा.

:–सुभाष जगताप (अध्यक्ष टपरी चालक मालक अशोशियशन संघटना करंजाळे माळशेज घाट रजि, ::–नंदकिशोर जगताप (उपाध्यक्ष) अंकुश भोईर व सर्व टपरी चालक मित्र परिवार

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button