अधिकारी वर्गाने केलेल्या स्थळ पाहाणी पंचनामा मध्ये दुसऱ्याच्याच मालकीचे घर दाखवले गेले.
गटविकास अधिकारी महेश डोके लाभार्थी कुटुंबाला कसा न्याय मिळवून देतील?
शुभम वाकचौरे
जांबूत : (ता.शिरूर) येथील इंदिरा आवास घरकुल घोटाळा प्रकरणी लाभार्थी उषा रणदिवे सोमवारी (ता.२४) रोजी उपोषणास बसणार असल्याचे वृत्त वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात आले. शिरूर येथे आमरण उपोषण होणार असल्याने.
या बाबीचे गांभीर्याने लक्ष घेता. शिरूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांचे मार्फत सन २००३ साली असलेले ग्रामपंचायत जांबूत चे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी तसेच शिरूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांचेमार्फत शनिवार (ता. २२ ) रोजी जांबूत येथे स्थळपाहणी व पंचनामा करण्यात आला.या पंचनामा मध्ये तत्कालीन ग्रामविकास अधिकारी एस.डी. दणाणे , विस्तार अधिकारी बी.आर. गावडे व ए.आर. गावडे यांचे सह पोलीस पाटील राहुल जगताप , ग्रामविकास अधिकारी एच.एल.चव्हाण यांनी केलेल्या स्थळ पाहणीत इंदिरा आवास घरकुल योजनेत उषा रणदिवे या लाभार्थीला मंजूर झालेले घरकुल म्हणून जांबूत गावठाण हद्दीतील सार्वजनिक समाजमंदिराच्या दक्षिण बाजूला उत्तर मुखी सिमेंट पत्रा असलेले पक्के बांधकाम स्वरूपाचे घर तत्कालीन ग्रामविकास अधिकारी एस.डी. दणाणे यांनी दाखविले. तत्कालीन ग्रामविकास अधिकारी दनाने यांचे असे म्हणणे आहे की श्रावण सोनवणे यांचे घर हे त्यांचे नसून रणदिवे कुटुंबीयांना मी दिलेले आहे.
रणदिवे कुटुंबियांचे हे घर असेल तर त्यांना घरकुलाची कल्पना का दिली नाही? वीस वर्षापासून त्यांना घरापासून वंचित का ठेवले? वेळोवेळी त्यांनी तक्रारी, अर्ज करून त्यांना याची माहिती का दिली नाही? घरकुल घोटाळा लपवण्याच्या हेतूने वेगळीच माहिती दिली गेली आहे का? अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मात्र दाखविण्यात आलेल्या घराचे मूळ मालक श्रावण सोनवणे आहे. त्यामुळे हे घर त्यांच्या मालकीचे व स्वत: च्या जागेत आहे. ते कोणत्याही प्रकारचे घरकुल नसून खाजगी घर आहे. या घरकुलाची नोंद १९९५ ला ग्रामपंचायत दप्तरी करण्यात आलेली आहे.नमुना नं. ८ च्या नोंदीनुसार घरकुल हे श्रावण सोनवणे यांचे नावे नोंद असल्याचे दिसत आहे .
घरकुल घोटाळा प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून याप्रकरणी योग्य शहानिशा करून योग्य न्याय मिळावा अशी मागणी रणदिवे कुटुंबीयांनी केली आहे.या प्रकरणात पुढील कार्यवाही गटविकास अधिकारी शिरूर महेश डोके हे करणार आहे. व लाभार्थीला कशाप्रकारे न्याय मिळवून देतात याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.