जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
डिंगोरे ता:-जुन्नर येथील टायगर झोन फार्मर प्रोड्युसर कंपनी कार्यालयात कृषी विभागाच्या वतीने जून महिना हा शासकीय पेरणी पंधरवडा म्हणून राबविण्यात येत आहे त्यानिमित्ताने पावसाळ्यात करावयाच्या कामांपैकी पेरणी हे शेतातील महत्वाचे मानले जाते परंतु ग्रामीण भागातील शेतकरी परंपरागत पेरणी करत असतात त्यामुळे उत्पादन योग्य प्रकारे मिळत नाही म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून पेरणी कशी करावी याचे सखोल मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना या कार्यक्रमातुन देण्यात आले. या ठिकाणी शासकीय पेरणी पंधरवडा कार्यक्रमात तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले व पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी निलेश बुधवंत हे गाव भेट देऊन शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया सर्टिफाइड देणे, टूथफुली बियाणे यातील फरक सांगून कोणत्याही बियाण्याचे पावती घेतल्याशिवाय व त्या जपून कसा ठेवायचा त्याचप्रमाणे बियाणेची पिशवी कशी फोडायची,बेण्याचे कंपन्या कोणत्या प्रकारे पीक काढणीपर्यंत खात्री देतात संपूर्ण मार्गदर्शन शेतकऱ्यांना आज टायगर झोन फार्मर प्रोडूसर कंपनीच्या ऑफिसमध्ये दिले
या कार्यक्रम प्रसंगी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय लोहोटे, सर्व संचालक मंडळ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते