शिरूर प्रतिनिधी: शकील मनियार
संपूर्ण विश्वामध्ये सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगामध्ये वृद्धी ,विकास,आणि शांती च्या प्रचारासाठी,वैश्विक बंधुभाव वाढवण्यासाठी योगाभ्यास आवश्यक आहे. रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी व निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणून योगाला आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान आहे. योगा केल्याने शरीरावर सकारात्मक परिणाम होतो शरीर आणि मन शांत करण्यासाठी, शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी, स्नायूंची ताकद वाढविण्यासाठी तसेच श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारण्यासाठी योगा अत्यावश्यक आहे सुदृढ आरोग्यासाठी योगा आवश्यक असे विचार मुख्याध्यापक विष्णू करपे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले *”योग करेगा भारत, स्वस्थ रहेगा भारत”* योगा चे जनक महर्षी पतंजली यांच्या कडून मिळालेल्या हा अनमोल ठेवा जपून योग साधना केली पाहिजे.शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपल्या देशात व जगाभारात योगसाधनेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. गेल्या कित्येक दशकांपासून भारताची ओळख असलेला योगाभ्यास आता *“आंतरराष्ट्रीय योग दिवस” या औचित्याने जगभरात अधिकृत रित्या मान्यताप्राप्त झाला आहे. या युगात उत्तम आरोग्यासाठी योगा ,प्राणायाम आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक विकास होणे आवश्यक आहे. यासाठी तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालयात संगीता दहिफळे मॅडम व कांचन राणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवले व त्यांच्याकडून करून घेतले यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी ही विद्यार्थ्यांसमवेत योग प्राणायाम यांचा आनंद घेतला. शिवाजी विधाटे सर यांनी सर्वांचे आभार मानले
.