जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

हिवताप निर्मूलन आणि शून्य हिवताप रुग्ण हे उद्दिष्ट २०२७ पर्यंत साध्य करण्यासाठी ‘हिवताप निर्मूलन अभियान’ लोकसहभागातून राबविण्यात येणार आह.दरवर्षी जून महिना हा ‘हिवताप प्रतिबंध महिना’ म्हणून पाळला जातो.तो राबवीत असताना नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे महत्त्व पटवून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्या हिवताप अधिकारी अपर्णा पाटील यांनी दिली. :–डास आणि त्यांच्या उत्पत्तीची ठिकाणे-:अॅनॉफिलीस डास:- हा हिवतापाचा प्रसार करतो. त्याची उत्पत्ती नदी, नाले,विहिरी आणि तळी या ठिकाणच्या स्वच्छ पाणीसाठ्यामध्ये होते.एडिस इजिप्ती:– हा डास डेंगी आणि चिकूनगुन्या या आजारांचा प्रसार करतो.त्याची उत्पत्ती घरगुती पाण्याच्या टाक्या,बॅरल,रांजण,हौद,फुटके डबे,टायर निरुपयोगी साठविलेले पाणी,घरातील कुलर,फ्रिजच्या डीप ट्रे मधील पाणी,मनी प्लॅन्ट मधील पाणी इत्यादी स्वच्छ पाणीसाठ्यामध्ये होते.क्यूलेक्स डास:-हा डास हत्तीरोगाचा प्रसार करतो.त्याची उत्पत्ती स्वतच्छता– गृहाचा सेष्टिक टैंक,तुंबलेली गटारे व पाण्याची डबकी या अस्वच्छ पाणीसाठ्यात होते. ::जानेवारी ते एप्रिलदरम्यान रुग्णांची स्थिती::हत्तीरोगाचे सध्या जिल्ह्यात २५ रुग्ण आहेत.हिवताप नियंत्रणासाठी जानेवारी ते एप्रिलपर्यंत जिल्हा,पिंपरी चिंचवड महापालिका, पुणे महापालिका या ठिकाणी एकूण ३ लाख ३० हजार ५४३ रक्त नमुने तपासण्यात आले.यापैकी ७ रुग्ण बाधित आढळून आले होते.चिकूनगुनिया संशयित म्हणून जानेवारी ते एप्रिलपर्यंत जिल्ह्यामध्ये ३७ रुग्ण वाथित आढळले. पिंपरी चिंचवड महापालिकेअंतर्गत १२ रुग्ण बाधित आढळले. पुणे महापालिकेअंतर्गत नऊ रुग्ण बाधित आढळून आले.आरोग्य विभागाच्या वतीने डेंगी संशयित १ हजार ५३५ रक्त नमुने जानेवारी ते एप्रिल दरम्यान तपासण्यात आले.यापैकी ४१ बाधित रुग्ण आढळून आले आहेत.याशिवाय पुणे जिल्हा ग्रामीण भागातून अनेक तालुक्यातील डेंग्यू रोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. पुणे जिल्हा ग्रामीण भागातील जुन्नर तालुक्यातील उत्तरेकडे उदापुर गावात मे महिन्यात डेंग्यू चे थैमान पाहण्यास मिळाले जवळपास या गावात ५५ ते ६० रुग्ण हिवताप,टायफॉईड आणि डेंग्यू चे रुग्ण बाधित होते आजही जून महिना संपत आला असून रुग्णाची संख्या कमी होत नाही अलीकडेच म्हणजे शुक्रवार दि:-२१ रोजी उदापुर गावातील ५०वर्षीय महिला निर्मला बाळासाहेब शिंदे डेंग्यू सदृश रोगाच्या बळी पडल्या आहेत.हिवतापामुळे दरवर्षी अनेकांना जीव गमवावा लागतो.हिवताप,डेंगी, चिकनगुन्या,हत्तीरोगसारखे आजार डास चावल्यामुळे होतात.अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक नागरिकाने प्रयत्न केला पाहिजे तरच या रोगांचे निर्मूलन शक्य होईल :— हिवतापाची लक्षणे…:•थंडी वाजून ताप येणे • सततचा किंवा एक.दिवसाआड येणारा ताप• घाम येऊन अंग गार पडणे• ताप आल्यानंतर डोके दुखणे• उलट्या होणे ताप आल्यास त्वरित वैद्यकीय सल्ल्यानुसार आवश्यक चाचण्या कराव्यात.शासकीय रुग्णालयात यासाठी मोफत औषधोपचार उपलब्ध आहेत. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावेत.डासांपासून संरक्षणासाठी घराच्या दारे,खिडक्यांना जाळ्या बसवाव्यात.तसेच आपल्या अवतीभवती परिसरामध्ये पाणी साठणार नाही याची काळजी घ्या. :–अपर्णा पाटील:-जिल्हा हिवताप अधिकारी.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button