सरकार आणि अधिकारी यांना जाग आणण्यासाठी शेतकरी संघटना करणार तीव्र स्वरूपाचे आंदोलन.
जुन्नर प्रतिनिधी :सचिन थोरवे
जुन्नर तालुक्यातील काही भागात अनेक दिवसापासून शेतकरी खत विक्रेत्यांकडे युरिया खताची मागणी करत आहे तालुक्यातला काही भागात पाऊस झाला असून जमिनीची पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाली असून शेतकरी आता खते आणि बियाणे घेऊन पेरणी करीत आहे परंतु केल्या अनेक दिवसापासून खत विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना युरिया हे खत उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी शेतकरी संघटने कडे आल्यानंतर शेतकरी संघटनेने कृषी अधिकारी भोसले यांच्याशी वारंवार संपर्क करून युरिया खत उपलब्ध करून द्या अशी मागणी केली परंतु युरिया अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना युरिया खताच्या कृत्रिम तुटवड्याला सामोरे जावे लागले आहे.
एकीकडे महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सांगतात की कुठल्याही शेतकऱ्याला खत किंवा बियाण्याच्या बाबतीत काही अडचण आल्यास आमच्या अधिकाऱ्याची संपर्क केला परंतु दुसरीकडे अधिकारीच शेतकऱ्यांचे प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात तालुक्यातील मागील वर्षातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून देखील ती भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही ती लवकरात लवकर मिळावी
पीक विम्याचे देखील पैसे काही शेतकऱ्यांचे मिळाले नसून ते पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारने जमा करावे अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक अंबादास हांडे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय भुजबळ त्याचप्रमाणे जुन्नर तालुका युवा आघाडी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन थोरवे हे कृषी अधिकारी भोसले यांच्याकडे मागणी करत आहेत. काही दुकानदार युरिया खत मागितल्यावर त्या एका गोणीबरोबर तुम्हाला जॉईंट काहीतरी दुसरे खत घ्यावे लागेल अशी जबरदस्ती करत आहेत याला वेळीच अधिकाऱ्यांनी लगाम न घातल्यास किंवा त्या खत विक्रेत्यांवर कृषी विभागाने कारवाई करून त्यांचे लायसन्स देखील लगेच रद्द करावे तसे न केल्यास शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक अडचणीत आणण्याचा प्रयत्न कुणाच्या संगनमताने होत आहे याची सखोल चौकशी व्हावी ही मागणी शेतकरी करत आहेत. यापुढील काळात कृषी अधिकारी आणि सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास त्यांना फळे आणि भाजीपाला पिकवण्यासाठी लागणारी रासायनिक खते वेळेत उपलब्ध न केल्यास त्यांच्या कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.