जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर


आज सोमवार दिनांक १७ जून २०२४ रोजी आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डिसेंट फाउंडेशन पुणे, शंकरा आय हॉस्पिटल पनवेल, सुवर्णयुग युवा मंच आळे व ज्येष्ठ नागरिक संघ आळे,संतवाडी, कोळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.या शिबिरात १२० जणांची नंतर तपासणी करण्यात आली व ४५ नेत्र रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शंकरा आय हॉस्पिटल पनवेल येथे पाठवण्यात आले.
रुग्णांना तपासणी,मोतीबिंदू शस्त्रक्रिया,प्रवास, निवास, जेवण, चष्मा व एक महिन्याची औषधे या सर्व सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.तसेच या शिबिरा मध्ये तिरळेपणावरील शस्त्रक्रिया देखील मोफतकेल्या जाणारा असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.असे आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले. याप्रसंगी शंकरा आय हॉस्पिटलचे शिबिर समन्वयक प्रकाश पाटील व त्यांची सर्व टीम,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भागाजी शेळके,उपाध्यक्ष किसन जाधव,सचिव शिवाजी कुऱ्हाडे,सहसचिव नामदेव दिघे, माजी सैनिक जालिंदर माळी,सखाराम कुऱ्हाडे, नागेश कुऱ्हाडे,किसन बहिरट,हिरोजी कुऱ्हाडे,पांडुरंग गाढवे, मंगल कुऱ्हाडे,आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button