जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर

दिनांक – १५ जून २०२४ रोजी शासकीय आश्रमशाळा खटकाळे ता:- जुन्नर जि:- पुणे ठिकाणी शैक्षणिक वर्ष २०२४- २५ या वर्षातील प्रथम दिवस “प्रवेशोत्सव”दिवस म्हणून मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरा करण्यात आला. प्रवेशोत्सवानिमित्त आकर्षक शाळा व परिसर सजावट करण्यात आली.यावेळी नवागतांचे स्वागत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप,विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तकला व चित्रकामाचे प्रदर्शन,तसेच शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वी विद्यार्थी,मार्च-२०२४, इयत्ता -१० वी व १२ या परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम पाच विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष रामदास झाडे व प्रमुख पाहुणे खटकाळे गावचे सरपंच बाळू आप्पा केदारी यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळा प्रतिनिधी शिक्षक सुरेश घोळवे व संभाजी सूर्यवंशी यांनी केले.सदर कार्यक्रमास कार्यालयीन प्रतिनिधी म्हणून माणिक चकवे ,सर्व शिक्षक,अधिक्षक, अधिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण गाढवे, योगेश गवारी व आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर भालेकर यांनी केले.

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button