जुन्नर प्रतिनिधी सचिन थोरवे

ग्रामपंचायत व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांनी आकर्षक फुग्याची सजावट करून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या प्रत्येक मुलाचे औक्षण केले व गुलाब पुष्प देवून विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले . या प्रसंगी विद्यालयात शिरोली बु गावचे सरपंच प्रदीपदादा थोरवे , उपसरपंच वैशालीताई थोरवे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुनिल विधाटे , शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सचिन थोरवे , शिक्षणप्रेमी ग्रामस्थ श्री विक्रम थोरवे , श्री दिनकर बोऱ्हाडे ,श्री विजय थोरवे , श्री अभिजीत शेरकर , शाळेच्या पर्यवेक्षक अनघा घोडके सर्व शिक्षक वृंद बहुसंख्येने पालक उपस्थित होते अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रसाद हांडे यांनी दिली.मान्यवरांच्या शुभहस्ते 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले ग्रंथपाल डुंबरे व्ही एम यांनी पुस्तक वाटपाचे नियोजन केले या प्रसंगी सरपंच प्रदीप शेठ थोरवे यांनी मार्च 2024 विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि सर्व विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या मान्यवरांचे स्वागत सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री अय्यर यांनी केले व आभार श्री देवकुळे यांनी मानले

Spread the love

By shirurmaharashtranews.com

पुणे जिल्ह्यातील ब्रेकिंग न्यूज, क्राईम आणि महाराष्ट्र आणि देशातील EXCLUSIVE बातम्या, राजकारणातील महत्वाच्या घडामोडी, सत्यता मांडणारे आणि निर्भीड भूमिका असणाऱ्या बातम्या, तसेच विविध विषयांवरील महत्वपूर्ण लेख आपले शिरूर महाराष्ट्र न्यूज वेब पोर्टल वर पब्लिश केले जातात. बातम्या साठी संपर्क करा 7038150232

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button