जुन्नर तालुका। प्रतिनिधी:-रविंद्र भोर
आज शनिवार दिनांक १५ जून २०२४ रोजी सावरगाव ता.जुन्नर, जि.पुणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंट फाउंडेशन पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोफत ब्रेस्ट कॅन्सर पूर्व तपासणी व जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महिलांची ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग मशीन द्वारे तपासणी करण्यात आली.
जुन्नर तालुका कॅन्सर मुक्त करण्याचा संकल्प डिसेंट फाउंडेशन ने केलेला असून महिलांचे आरोग्य जपण्यासाठी डिसेंट फाउंडेशन प्रयत्न करीत आहे. त्या अनुषंगाने दर महिन्याच्या पंधरा तारखेला जुन्नर तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात या शिबिराचे आयोजन केले जाते, तसेच गावोगावी देखील शिबिराचे आयोजन केले जाते.ज्या तपासणी साठी अंदाजे अडीच ते तीन हजार रुपये खर्च येतो ती तपासणी डिसेंट फाउंडेशन मार्फत मोफत करण्यात येते. तरी जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी केले.
यावेळी कर्करोगाची लक्षणे व घ्यावयाची काळजी याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. देवयानी देशमुख यांनी महिलांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी माझी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले, डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवयानी देशमुख, डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर फकीर आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, सावरगावचे सरपंच दीपक बाळसराफ, उपसरपंच संजीवनी हिंगे, ऍडव्होकेट मारुती ढमढेरे, तपासणी तज्ञ सपना बेलवटे, मंगल गाडगे, ग्रामपंचायत सदस्य अशा सेविका व महिला भगिनी उपस्थित होत्या.