जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
निवृत्त मुख्याध्यापक व आदर्श शिक्षक मुरलीधर बिडवई यांच्या वाढदिवसानिमित्त खामुंडी, ता:-जुन्नर येथील वीस गरजू आजी-आजोबांना आधार काठ्यांचे वाटप करण्यात आले.ज्येष्ठांनी उतारवयात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांनी उपस्थितांना केले.यापुढील काळात ज्येष्ठांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करणार असल्याचे डिसेंट फाऊंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवई यांनी यावेळी सांगितले.
जुन्नर तालुक्यातील पाच हजार जेष्ठ आजी आजोबांना मोफत आधार काठ्यांचे वाटप करण्यात आले आहे.तसेच तेराशे जणांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या असून यापुढेही करणार असल्याचे डिसेंट फाउंडेशनचे सेक्रेटरी डॉ.फकीर आतार यांनी सांगितले.याप्रसंगी जुन्नर तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा.एकनाथ डोंगरे,खामुंडीचे सरपंच वनराज शिंगोटे,काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मारुती शिंगोटे,शंकर भिसे, भिवाजी मावळे,काळभैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कुसाळकर,अरुण शिंगोटे,ज्ञानेश्वर डुंबरे,दत्तात्रय खोकराळे,शिरीष डुंबरे,नामदेव डोंगरे, दिनकर गावडे,योगेश वाकचौरे आदी मान्यवर ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक कुसाळकर यांनी केले तर सूत्रसंचालन उपेंद्र डुंबरे यांनी केले.