जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
चाईल्ड फंड इंडिया ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी सामाजिक संस्था असुन लहान मुलं,युवक,महिला,अंगणवाडी,शाळा इत्यादी सोबत सामाजिक उपक्रम राबविले जाते.यामध्ये 0-६, ७-१४ व १५-२४ या वयोगटातील मुलं व त्यांच्या कुटुंबा बरोबर आरोग्य,शिक्षण,स्वच्छता,उपजीविका आधारित उपक्रम गाव पातळीवर राबविले जातात. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून शिक्षण या थीम आणि लाईफ स्टेज ३ मधील १४ ते १६ या वयोगटातील म्हणजेच जे विद्यार्थी इयत्ता १० वि आणि इयत्ता १२वि उत्तीर्ण झालेल्या गुणांना अधिक वाव मिळावा,आणि भविष्यात आपले आवडते क्षेत्रात करिअर करण्यासाठी व योग्य दिशा मिळाविण्यासाठी मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने हरीचंद्रगडाच्या पायथ्याशी खिरेश्वर ता:-जुन्नर या आदिवासी भागातील चाईल्ड फ़ंड या संस्थेच्या सेंटर मध्ये करिअर गायडन्स आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी करिअर मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र भोर यांनी मुलांना आनंददायी वातावरणात भविष्यात दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर कोणत्या क्षेत्रात करिअर बाबत संधी आहेत तसेच इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर नेमके आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर कसे करावे त्यासाठी कोणत्या प्रकारची शिक्षण शाखा निवडावी याचे सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांसाठी चाईल्ड फंड इंडिया संस्थेचे पुणे शाखेचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अभिजित मदने,संस्थेचे समन्वयक अजित सोर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी योगेश मस्करे यांनी गावपातळीवर परिश्रम घेतले.