जुन्नर तालुका प्रतिनिधी:-रविंद्र भोर
चाईल्ड फंड इंडिया ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी सामाजिक संस्था असुन लहान मुलं,युवक,महिला,अंगणवाडी,शाळा इत्यादी सोबत सामाजिक उपक्रम राबविले जाते.यामध्ये 0-६, ७-१४ व १५-२४ या वयोगटातील मुलं व त्यांच्या कुटुंबा बरोबर आरोग्य,शिक्षण,स्वच्छता,उपजीविका आधारित उपक्रम गाव पातळीवर राबविले जातात. या उपक्रमाचाच एक भाग म्हणून शिक्षण या थीम आणि लाईफ स्टेज २ मधील ६-१४ या वयोगटातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, आनंददायी शिक्षण मिळावे,प्रत्येकाला आपल्यातील सुप्त गुण शोधण्याची संधी मिळावी या उद्देशाने गाव पातळीवर खिलता बचपण- आर्ट अँड क्राफ्ट हा उपक्रम ओतूर क्रीडा संकुल येथे घेण्यात आले.
या कार्यक्रमासाठी साधनव्यक्ती हिंदुराव गेजगे यांनी मुलांना आनंददायी वातावरणात वारली पेंटिंग,पक्षी, विविध कागदी फुले,तोरण बनविणे व कृतीगीते मुलांसोबत घेतले व मुलांनीही आनंदाने सर्व गोष्टी शिकुन घेतल्या.
या कार्यक्रमांसाठी चाईल्ड फंड इंडिया संस्थेचे पुणे शाखेचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी अभिजित मदने यांनी मार्गदर्शन केले.तसेच स्वराज्य क्रिकेट अकॅडमी व त्यांची टीम यांचे मोलाचे सहकार्य मिळाले व हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे समन्वयकअजित सोर व समूह संघटक कविता घोलप, दिपाली जगताप रवी शिंदे,योगेश मस्करे यांनी गावपातळीवर परिश्रम घेतले.